मुक्तपीठ टीम
गूगलला टक्कर देण्यासाठी बनवण्यात आलेले नीवा हे सर्च इंजिन लवकरच लॉन्च करण्यात येईल. हे सर्च इंजिन जाहिरात फ्री असणार आहे. गूगलला पर्याय म्हणून लवकरच एक भारतीय सर्च इंजिन उपलब्ध होईल. आयआयटीचे माजी विद्यार्थी श्रीधर रामास्वामी आणि विवेक रघुनाथन हे आणि गूगलचे माजी कर्मचारीही आहेत. ते यावर्षी ‘जाहिरात फ्री सर्च इंजिन’ लॉन्च करणार आहेत. ‘नीवा’ हे एक पेड उत्पादन असेल.
रामास्वामी म्हणाले की, “कोणत्याही ठिकाणी वेळेनुसार कंपन्या अधिकाधिक जाहिराती दाखवतात, ज्या वापरकर्त्यांना नको असतात, यासाठी आम्ही एक जाहिरात फ्री सर्च इंजिन तयार करत आहोत, जे केवळ ग्राहकांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करणार आहे.”
ते गूगलची ट्रॅव्हल, शॉपिंग आणि सर्च इंफ्रास्ट्रक्चर ची टीम देखील चालवतात. रघुनाथन यांनी आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेतले आणि यापूर्वी ते यूट्यूबवर मॉनिटाइजेशनचे उपाध्यक्ष होते. त्याचप्रमाणे विवेक हे गुगल असिस्टंटचे पहिले टेक लीडर होते. विवेक आयआयटी चेन्नईमधून पदवीधर आहेत.
नीवाकडे अमेरिकेत ४५ लोकांची टीम असून कंपनीने चार-पाच महिन्यांत ही योजना आखण्याचे ठरवले आहे. हे पहिल्यांदायूएस मध्ये आणि नंतर पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मग भारतात आणले जाईल. रामास्वामी म्हणतात की, आमच्याकडे इंजीनिअर, डिझाइनर आणि उत्पादन व्यवस्थापक आणि बँकर्सची एक मोठी टीम आहे. ग्रेव्हलॉक, सेक्वाइया कॅपिटल आणि रामास्वामी यांनी स्वतःच्या गुंतवणूकीमधून नीवाने आतापर्यंत ३७.५ दशलक्ष रुपये जमा केले आहेत.
रामास्वामी म्हणाले की, “लोक सध्या वापरत असलेल्या उत्पादनांपेक्षा हे वेगळे आहे, जे ड्रॉपबॉक्स आणि ईमेल खात्यांसारख्या सेवांवरील वैयक्तिक डेटामध्ये शोधण्यासाठी एक सिंगल विंडो प्रदान करते. गूगलप्रमाणेच, नीवादेखील एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि मशीन लर्निंगचा शोध घेईल.”
वैयक्तिक डेटाबद्दल रामास्वामी हमी देतात. त्यांचा दावा आहे की, “हे उत्पादन आणि कंपनी यांना अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की, वैयक्तिक डेटा फक्त चांगल्या परिणामांसाठी इंडेक्स केला जाणार आहे. इतर कशासाठीही हा डेटा वापरला जाणार नाही. आम्ही फक्त ग्राहकांसाठी कंपनी तयार केली आहे. “ही एक रेव्हेन्यू सोर्स कंपनी आहे.” कंपनीचे म्हणणे आहे की, डेटा कोणत्याही रूपात कधीही विकला जाणार नाही ‘आणि सर्च हिस्ट्री डीफॉल्टनुसार ९० दिवसांनंतर हटवली जाईल.
पाहा व्हिडीओ :