Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी देशातील गुणवंत विद्यार्थ्यांनी पाहिलं पंतप्रधानांसोबत प्रजासत्ताक दिन संचलन

January 27, 2021
in चांगल्या बातम्या
0
republic day

मुक्तपीठ टीम

 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनाच्या वेळी पंतप्रधानांसोबत असलेल्या खास पाहुण्यांबद्दल. पंतप्रधानांसाठी असलेल्या खास आसन व्यवस्थेच्या बॉक्समध्ये प्रजासत्ताक दिनी खास पाहुणे आहेत. हे खास पाहुणे देशातील १०० गुणवंत  विद्यार्थी आहेत . त्यांना त्या खास जागेतून प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी मिळाली.

 

देशभरातील शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधान बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी देण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधान बॉक्समधून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्याची संधी मिळाली. तसेच या विद्यार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनाही भेटण्याची संधी दिली जाईल.

 

२०२० च्या बोर्डाच्या दहावी आणि १२ वीच्या परीक्षेतील प्रथम तसेच विविध विद्यापीठे आणि यूजी व पीजी अभ्यासक्रमांच्या टॉपर्सना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे..

 

प्रजासत्ताक दिनी संचलन पाहण्यासाठी शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमधील एकूण १०० विद्यार्थ्यांची यादी केली गेली होती. यापैकी ५० विद्यार्थ्यांची देशभरातील शाळांमधून आणि उर्वरित ५० विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण संस्थांमधून निवड करण्यात आली .

 

गेल्या वर्षीही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात १०५ सीबीएसई बोर्डाच्या टॉपर्स आणि युनिव्हर्सिटीच्या टॉपर्सना पंतप्रधान बॉक्समधून परेड पाहण्याची संधी देण्यात आली होती.

 

यावेळी कोरोना साथीमुळे आवश्यक असणारी दक्षता घेतली जात आहे. त्यामुळेच  यावेळेस प्रजासत्ताक दिनाच्या संचलनादरम्यान मोटारसायकल स्टंट इत्यादी मुख्य आकर्षणांचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

यावर्षी दर्शकांची संख्या २५,००० करण्यात आली आहे. ज्या मुलांना शौर्य पुरस्कार किंवा इतर पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यांना या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन समारंभात सहभागी करण्यात आलेले नाही.

 

पाहा व्हिडीओ :


Tags: Bravery AwardMotorcycle stuntsmumbai universityPM Narendra modirepublic dayकोरोनापंतप्रधान नरेंद्र मोदीभारतीय प्रजासत्ताक दिनमोटारसायकल स्टंटशौर्य पुरस्कार
Previous Post

पद्म पुरस्कार जाहीर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळांना पद्मश्री!

Next Post

#चांगलीबातमी डिजिटल स्वातंत्र्य, इंटरनेट सर्चचा अधिकार, नवे ‘मेड इन इंडिया’ सर्च इंजिन

Next Post
changli batmi

#चांगलीबातमी डिजिटल स्वातंत्र्य, इंटरनेट सर्चचा अधिकार, नवे ‘मेड इन इंडिया’ सर्च इंजिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!