Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“होलार समाजाचा बार्टी नव्याने अभ्यास करणार”- धनंजय मुंडे

June 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
dhananjay munde

मुक्तपीठ टीम

होलार समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेवून या समाजातील विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिली.

मंत्रालय येथे राज्यातील होलार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे, बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योति गजभिये, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, समाजकल्याण विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे, मानिकराव भंडगे यासह सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागातंर्गत उच्चस्तरीय समिती नेमून होलार समाजाच्या जातीच्या वर्गवारी संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. होलार समाजासंदर्भात बार्टीने नव्याने या जातींचा अभ्यास करावा. जातीच्या नोंदी जेव्हा नव्याने केल्या जातील तेव्हा त्या अगदी काटेकोरपणे करण्यावर भर द्यावा. या समाजाने महामानवाच्या यादीसाठी जी नावे सुचविली आहेत ती शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्यांचा यामध्ये समावेश करण्यात यावा, स्टँडअप योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या समाजातील जास्तीत जास्त उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी नव्याने धोरण करत असून ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दादासाहेब सबलीकरण योजना राबविताना ज्या लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे त्यांना समन्यायी वाटप करावे याबाबत सामाजिक न्याय विभागाने सर्व जिल्हाधिकारी व समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त यांना पत्राव्दारे कळवावे. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये सर्वांना समन्याय देण्यात यावा अशा सक्त सूचना बैठकीत धनंजय मुंडे यांनी केल्या.

 

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव श्याम तागडे यांनी होलार समाजासंदर्भात सद्यस्थितीत सुरू असलेली कार्यवाहीची सविस्तर माहिती बैठकीत दिली.

 

होलार समाजाचे प्रतिनिधी राजाराम देवळे यांनी यावेळी होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी अनेक सुचना मांडल्या. या समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ,ब,क,ड वर्गवारी करून होलार समाजाला ठराविक आरक्षण मिळावे, होलार समाजाची स्थानिक चौकशी करून त्या आधारावर जात पडताळणी मिळावी, होलार समाजातील वाजंत्री कलाकांरासाठी अनुदानाची शिफारस, मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहात होलार समाजातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात यावा,होलार समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे,राज्यस्तरावरील समितीमध्ये या समाजाचा प्रतिनिधी नेमणे, या समाजात उद्योजक तयार व्हावेत यासाठी शासनाकडून नव्याने योजना देण्यात याव्यात अशा विविध सुचना या बैठकीत होलार समाजाच्या प्रतिनिधींनी मांडल्या.


Tags: Dhananjay MundeHolar communityसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
Previous Post

साईबाबा संस्थान अध्यक्षपदी राष्ट्रवादी, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे

Next Post

बुलडाण्यातील प्रसेनजीत पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतले

Next Post
NCP

बुलडाण्यातील प्रसेनजीत पाटील राष्ट्रवादीत स्वगृही परतले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!