मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हिजाब सेना आरोपाला प्रत्युत्तर दिलं. त्यांनी भाजपालाच हिजबुल सेना म्हटलं. त्यांना टोला मारताना फडणवीस यांनी शिवसेना बाळासाहेबांना जनाब म्हणते, अजान स्पर्धा घेते, आणि आम्हालाच बोलतात, असं म्हटलंय. त्याआधी पुण्यातही बैलगाडा शर्यतीच्यावेळीही त्यांनी मविआला टोले मारले.
आपण लोकांनी नंबर १ बनवलेले मुख्यमंत्री होतो. पण तिघांनी तिघांच्या मार्कशीट एकत्र करत नंबर १ मिळवला असा टोला मारला आहे.
बैलगाडा शर्यत आमच्यामुळेच सुरु!
- आज देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीला गेले होते.
- आपलं सरकार आलं आणि आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली.
- मात्र ही मंडळी पुन्हा न्यायालयात गेली आणि बंदी आणली.
- मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आणि बैल हा धावणारा प्राणी आहे म्हणून कागदपत्रे देत ही बंदी उठवली.
शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांच्या नंबरवर कोटी करत पुन्हा महाविकास आघाडीला टोले लगावले.
मी ठरवलं की पहिला नंबर येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट एकत्र करून पहिले आले.