मुक्तपीठ टीम
गोव्यात भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीचं कौतुक झालं. बहुमतापासून १ आकडा लांब राहिलेल्या भाजपाने अपक्षांच्या मदतीने सत्तेची सूत्र जमवली. आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत हे विराजमान होणार आहेत. या यशामागचं कारण देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात सांगितलं.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
- गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपानं संधीचं सोनं केलं.
- गोव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही प्रचारासाठी आले होते.
- गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर याठिकाणी भाजपाला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश बदलतोय.
- नितीन गडकरींच्या माध्यमातून रस्ते तयार होत आहेत.
- देशात प्रत्येकाला मोफत कोरोना लसीकरण करण्यात आलंय.
- वीस हजार लोकांना युक्रेनमधून काढण्यात आलं. हे भाजपप्रती असलेलं विश्वासाचं वातावरण आहे.
फडणवीसांची विरोधकांवरही टीका
- गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपले नशीब आजमावयला आले होते. पण, गोव्याच्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखविली.
- शिवसेना, राष्ट्रवादीचे हे मुंगेरीलाल के हसीनं सप्ने होते, अशी टीका फडणवीसांनी केली.
- गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीची लढाई ही नोटाशी आहे.
- शिवसेना, राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराचं डिपाझिट राहिलं नाही, याची आठवण त्यांनी करून दिली.
- “महाविकास आघाडी नव्हे महावसुली आघाडी सरकार”
- राज्यात भ्रष्टाचारी सरकारविरोधात सामान्य माणूस भाजपाच्या सोबत आहे.
- राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे.
- सरकारमधील दोन मंत्री तुरुंगात आहेत. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे.
- प्रवीण दरेकरांना फसवण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही.
- गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार.