Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य सरकारचा कट उघड केल्यानेच मला पोलिसांची नोटीस, फडणवीसांचा आघाडी सरकारवर आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
devendra fadnavis

मुक्तपीठ टीम

विरोधी पक्षनेता म्हणून जरी मला प्रीव्हिलेज आहे, माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. मात्र तरीही राज्य सरकारमधील पोलीसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी नोटीस मला बजावली असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आशिष शेलार यांची देखील उपस्थिती होती.

 

बॉमस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही मंत्रिमंडळात कायम…

  • आज १२ मार्च आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की, मुंबईचा बॉमस्फोट हा १२ मार्च रोजी झाला होता आणि आता तीन दशकं झाली तरी त्याचे पडसाद आणि त्याचे घाव हे आपल्या मनावर कायम आहेत.
  • आज एकीकडे १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉमस्फोटात शहीद झालेल्या सर्व मुंबईकरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचवेळी बॉमस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे, जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहेत, याबद्दल मी खंत व्यक्त करतो.

 

मला प्रीव्हिलेज, माहिती कुठून आली, हा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही…

  • आज मी जे बोलणार आहे त्याचा संदर्भ माहविकास आघाडी सरकारचा होम डिपार्टमधल्या बदल्याचा महाघोटाळा बाहेर काढला होता.
  • महाविकास आघाडी सरकारमधील गृहविभागातला महाघोटाळा मी मार्च २०२१ उघडकीस आणला होता.
  • माझ्याकडे यासंदर्भातील ट्रान्सस्क्रिप्ट, पेनड्राइव्ह सगळं माझ्याकडे आहे, हे सांगितलं होतं.
  • ते देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय, हे म्हटलं होतं.
  • त्यानुसार, जी काही घोटाळ्याची माहिती होती, ती सगळी माहिती त्याच दिवशी दिल्लीला गेलो आणि होम सेक्रेटरी यांना सगळी माहिती सादर केली होती. त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून मा. न्यायालयाने यासंदर्भातली सगळी चौकशी सीबीआयला सुपूर्द केली आहे.
  • बदल्यांसंदर्भातील घोट्ळ्याची चौकशी सीबीआय करतेय.
  • अनिल देशमुखांची चौकशी होतेय.
  • हे सध्या तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत.
  • अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येत आहेत.
  • मात्र ज्यावेळी ही सर्व चौकशी सीबीआयला ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने घोटाळा दाबण्याकरिता एफआयआर दाखल केला.
  • ऑफिसिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती लिक कशी झाली, असा एफआयआर दाखल केला.
  • यासंदर्भात मला पोलिसांच्यावतीने प्रश्न पाठवण्यात आले.
  • मी उत्तर दिलं होतं की, याची माहिती देईन.
  • खरं तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेते म्हणून मला प्रीव्हिलेज आहे, माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही.

 

पोलीस जी चौकशी करतील, त्याला योग्य उत्तर देणार…

  • तथापि, मला पुन्हा एकदा प्रश्नावली पाठवण्यात आली आणि न्यायालयात सांगण्यात आलं की मी उत्तर देत नाहीये.
  • काल मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली.
  • याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात, त्यांच्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी बोलवलं आहे.
  • मी केलेल्या भांडाफोडला उत्तरच नाही…
  • ‘विरोधी पक्षनेत्याला माहितीचा स्रोत विचारता येत नसतो’
  • पहिल्यांदा स्पष्ट करतो, विरोधी पक्षनेता म्हणून जरी मला प्रीव्हिलेज आहे , माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही.
  • दुसरं म्हणजे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिलीय. बाहेर येऊ दिली नाही.
  • उलट राज्य सरकारच्या मंत्र्यांनी प्रेसला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.
  • तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे.
  • पोलीस जी चौकशी करतील, त्याला योग्य उत्तर देणार आहे. कारण मी गृहमंत्री देखिल राहिलेलो आहे.
  • पोलिसांनी चुकीची केस केली तरीही तपासात माझं सहाय्य मागितलंय म्हणून मी निश्चितपणे देईन.
  • अपेक्षा एवढीच आहे, माहिती बाहेर कशी आली, याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, सहा महिने सरकारकडे अहवाल पडला होता.
  • कुणी किती पैसे दिले, कोण कुठल्या जिल्ह्यात गेलाय, अशी संवेदनशील माहिती असताना, सरकारने काही कारवाई केली नाही.
  • सरकारवर कारवाई झाली पाहिजे की, ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा प्रश्न आहे.

 

षडयत्राचा भांडाफोड केल्यामुळे मला नोटीस…

  • पण मला या गोष्टीचा समाधान आहे की मा. सर्वोच्च न्यायालयाने ही सर्व माहिती सीबीआयला दिली आणि आता तर न्यायालयाच्या निर्णयामुळे ऑफिशियल पेनड्राईव्ह किंवा ही सर्व माहीती ट्रान्सक्रिप्ट या राज्याला सीबीआयला सोपवाव्या लागल्या.
  • त्यामुळे या प्रकरणात तसाही कुठला अर्थ उरत नाही.
  • मात्र आता जी काय राज्य सरकारची परिस्थिती आहे, आणि विशेषत: परवाचा जो षडयत्राचा भांडा फोड मी स्वत: केलाय त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिस किंवा पोलिसांचे काही अधिकारी यांना आता त्याचं उत्तर सुचत नसल्यामुळे मला अशा प्रकराची नोटीस पाठवण्यात आली आहे.
  • मी निश्चितपणे उद्या ११ वाजता बीकेसी सायबर पोलीस स्टेशनला हजर राहिन.

Tags: BJPdevendra fadnavisMva govtदेवेंद्र फडणवीसभाजपामाहविकास आघाडी सरकारराज्य सरकार
Previous Post

‘गोदरेज अॅग्रोव्हेट’चे नवीन कीटकनाशक ‘ग्रेशिया’; जपानी फॉर्म्युला, काही तासातच परिणाम, पण उपयोगी किटक आणि सस्तन प्राण्यांसाठी सुरक्षित असल्याचा दावा!

Next Post

काँग्रेसचे झोपलेले नाराज नेते जागे झाले! पाच राज्यांमधील पराभवानंतर पक्ष नेतृत्वार खापर फोडायला सरसावले!!

Next Post
Gulab Nabi , anand sharma , kapil sibbal manish tiwari

काँग्रेसचे झोपलेले नाराज नेते जागे झाले! पाच राज्यांमधील पराभवानंतर पक्ष नेतृत्वार खापर फोडायला सरसावले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!