Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसचे झोपलेले नाराज नेते जागे झाले! पाच राज्यांमधील पराभवानंतर पक्ष नेतृत्वार खापर फोडायला सरसावले!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gulab Nabi , anand sharma , kapil sibbal manish tiwari

मुक्तपीठ टीम

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कौल चार राज्यांमध्ये भाजपाला यशदायी ठरला आहे. पंजाब सोडून भाजपाला चार राज्यात दणदणीत विजय मिळाला. मात्र पाचपैकी एकाही राज्यात काँग्रेसला यश मिळालेले नाही. स्वत:ला काँग्रसचे शुभचिंतक म्हणवणारे जी-२३चे नाराज नेते आता जागे झाले आहेत. या नाराज नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात शुक्रवारी सायंकाळी उशिरा पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी नाराज नेत्यांची बैठकही झाली. त्यांना काँग्रेसमधूनही प्रत्युतर मिळत असल्याने पराभवानं हादरलेल्या काँग्रेसचं ग़टबाजीचं शेपूट वाक़डंच असल्याचं दिसत आहे.

 

पक्ष कार्यकारिणीची लवकरच बैठक घेण्याची तयारी!

  • पराभवाच्या कारणांचा विचार करण्यासाठी काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची लवकरच बैठक घेण्याची तयारी करत आहे.
  • या बैठकीपूर्वी पक्षातील नाराज नेत्यांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
  • त्यामुळे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर दबाव आणता येईल.
  • या संदर्भात ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांच्यासह अनेक नाराज नेते उपस्थित होते. निवडणुकीत पक्षाच्या पराभवावर बैठकीत चर्चा झाली.
  • एका नाराज नेत्याने सांगितले की, पराभवाची कारणे शोधण्यासाठी बोलावलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते जोरदार मुद्दे मांडतील.
  • या नेत्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळही मागितला आहे.

 

पक्ष नेतृत्वावर खापर, पण हे नाराज नेते होते कुठे?

  • नाराज नेत्यांचे म्हणणे आहे की २०१४ नंतर लोकसभा आणि विविध विधानसभांच्या सुमारे ४५ निवडणुका झाल्या.
  • मात्र, यापैकी केवळ पाच निवडणुका काँग्रेसला जिंकता आल्या आहेत. असे असतानाही पक्षाने कधीही पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला नाही.
  • त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.
  • परंतु त्यांच्या पक्ष नेतृत्वार खापर फोडण्याच्या वृत्तीमुळे निष्ठावान त्यांच्यावर नाराज आहेत.
  • हे नाराज नेते पक्षाची काळजी दाखवत असले तरी ते मुळात निवडणूक प्रचाराच्यावेळी कुठे असतात, का जोमाने भाजपाविरोधात जोमाने प्रचार करत नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे.

Tags: CongressGhulam Nabi AzadKapil SibalManish Tewariआनंद शर्माकपिल सिब्बलकाँग्रेसगुलाम नबी आझादमनीष तिवारी
Previous Post

राज्य सरकारचा कट उघड केल्यानेच मला पोलिसांची नोटीस, फडणवीसांचा आघाडी सरकारवर आरोप

Next Post

राज्यात ३२४ नवे रुग्ण,  ५२५ रुग्ण बरे!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ३२४ नवे रुग्ण,  ५२५ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!