Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीसांचा आघाडीवर विधानसभेची अब्रू घालवल्याचा घणाघात, तर जाधव म्हणतात, संघर्ष संपलेला नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp 12 mlas

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. भाजपा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहे. एकीकडे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने वेळीच आमदारांच्या विनंतीला मान देत निलंबन मागे घेतले असते तर विधानसभेची अब्रू वाचली असती, असे म्हटले आहे तर दुसरीकडे तत्कालीन तालिक अध्यक्ष भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, संघर्ष संपला नाही. विधानभवनाच्या प्रांगणात कोणाला प्रवेश द्यायचा, कुणाला नाही, हा अध्यक्षांचा अधिकार आहे.

 

सरकारला मिळालेली थप्पड – फडणवीस

  • सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी हे निलंबन अवैध असल्याचे म्हटले आहे.
  • एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला या निकालमुळे एक थप्पडच मिळाली आहे.
  • महाराष्ट्रात सातत्याने संविधानाची पायमल्ली चालली आहे.
  • Abuse of power मोठ्या प्रमाणावर आहे.
  • त्याचा कळस म्हणजे हा निर्णय होता.

 

…तर विधानसभेची अब्रू वाचली असती!

  • सर्वोच्च न्यायायलायने सरकारला एक संधी दिली होती.
  • अधिवेशनापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सांगितलं होतं की, या १२आमदारांनी अध्यक्षांकडे अर्ज करावा आणि त्यासंदर्भातला निर्णय विधानसभेने घ्यावा.
  • १२ आमदारांनी अर्जही केला होता.
  • परंतु सत्तेचा अहंकार डोक्यात असल्याने त्यावर कार्यवाही करण्यास महाविकास आघाडी सरकराने नकार दिला.
  • खरं तर माझ्यासहित आमच्या सगळ्यांचं मत आहे की, विधानसभेची कारवाई ही न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर असली पाहिजे.
    ती बाहेर आहेच.
  • पण ज्या वेळी संविधानाची पायमल्ली होईल, त्या त्या वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप होणारच आहे.
  • ज्यावेळी १२ आमदारांनी अर्ज केला, तेव्हाही मी सांगितलं होतं, तुमचा निर्णय असंवैधानिक आहे.
  • त्यामुळे तो परत घ्यावा, म्हणजे विधानसभेची अब्रू वाचेल व आपला सर्वोच्च अधिकार अबाधित राहिल.
  • न्यायालयानेही ती संधी दिली होती.
  • मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि ऐतिहासिक प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

 

मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे

  • पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे षड्यंत्र रचणारे , सभागृहात खोट्या कथा रचणारे कोण होते, या आमदारांना टार्गेट करणारे कोण होते, हेदेखील आता समोर आलं पाहिजे.
  • आणि ज्यांनी ही कारवाई केली, त्यांनी १२ मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे.
  • या निर्णयामुळे सभागृह चालवत असताना मेजॉरिटीच्या भरोशावर Abuse Of Power करता येत नाही, अशा प्रकारचा पायंडा न्यायालयाने सेट केला आहे, त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

 

भास्कर जाधव म्हणतात संघर्ष संपलेला नाही…

  • भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करताना तालिका अध्यक्ष असलेले भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • भास्कर जाधव म्हणाले की, संघर्ष संपला नाही.
  • प्रांगणात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नाही हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे.
  • जाधव म्हणाले की, विधानमंडळाला संविधानानं दिलेले अधिकार आहेत.
  • लोकशाहीत परस्पर आदर करण्याची प्रथा आहे.
  • भाजपनं देखील आम्हाला निलंबित केलं होतं.
  • मी भाजपा आणि न्यायालयाला प्रश्न विचारतो की, राज्यपालांनी १२ विधानपरिषदेच्या आमदारांची यादी प्रलंबित ठेवली आहे.
  • राज्यपालांनी १२ आमदारांना बाहेर ठेवलं आहे, यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार आहे? असा प्रश्नही जाधव यांनी केला आहे.

Tags: bhaskar jadhavBJPdevendra fadanvisMva govtSupreme Courtदेवेंद्र फडणवीसभाजपाभास्कर जाधवमविआ सरकारमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालय
Previous Post

राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या यादीत दडलंय काय? राजभवनाप्रमाणेच मंत्रालयाचाही यादी देण्यास नकार!

Next Post

अविनाश धर्माधिकारींची ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ ‘स्टोरीटेल’वर!

Next Post
Avinash Dharmadhikarin's Aswastha dashkachi dairy on storytel

अविनाश धर्माधिकारींची 'अस्वस्थ दशकाची डायरी' 'स्टोरीटेल'वर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!