Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी संग्रामचे नेते दिवाकर शेजवळ यांची शब्दांजली…

नामदेव ढसाळ: एक अस्सल पँथर आठवताना...

January 15, 2022
in प्रेरणा, विशेष, व्हा अभिव्यक्त!
0
Namdev Dhasal

दिवाकर शेजवळ

नामदेव दादा, निरर्थक भावनिक प्रश्नांना फाटा देऊन आंबेडकरी चळवळीत जो कुणी समाजाच्या थेट हिताशी निगडित मूलभूत प्रश्नांवर… म्हणजे शिक्षण, नोकरी, रोजगार, निवारा, शोषणावर बोलेल त्याला आजवर नेहमीच कम्युनिस्ट ठरवले गेले. त्यातून ‘कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय ‘असा रोकडा सवाल विचारत भूमिहीनांचे ऐतिहासिक आंदोलन करणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाडही सुटले नाहीत.मग तिथे तुमची काय कथा!

 

पण कम्युनिस्टांनी मला गिळले तर माझ्यापाशी भिमाची वाघनखे आहेत. मी त्यांची पोटे फाडून बाहेर येईन, असे ठणकावत दादासाहेबांनी त्यांना कम्युनिस्ट ठरवणाऱ्या, धोतऱ्या अशी संभावना करणाऱ्या सूट बुटातील विद्वान नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. दुर्दैवाने, तुमच्या बाबतीत तसे घडले नाही. प्रवाहपतीत होण्याची वेळ तुमच्यावरच आली होती.

 

तुमच्यावर चपात्यांचा झालेला मारा तुम्हाला कम्युनिस्ट ठरवणाऱयांना असुरी आनंद देऊन गेला. विशेष म्हणजे, तुम्हाला अशा काळात कम्युनिस्ट ठरवले गेले की ज्या काळात शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलेला होता. त्यातच पँथर नेता म्हणून वरळी दंगलीनंतर तुम्ही निशाण्यावर आलाच होतात. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे, वावरणे जोखमीचे झाल्यानंतर तो काळ तुम्ही कसा कंठला असेल याची कल्पनाही करवत नाही.

 

पण दादा, तुम्ही हिकमती होतात. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला पाठिंबा देऊन तुम्ही चक्रव्यूह भेदून टाकला. तुमची आणि इंदिराजी यांची भेट – मुलाखत दूरदर्शनवरून प्रसारित झाल्यावर तर सारे चित्रच पालटून गेले होते. पँथरच्या सभेनंतर तुम्हाला जेरबंद करण्यासाठो टपून बसणारे पोलीस तुम्ही दिल्लीहून परतण्याआधी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासोबत तुमच्या स्वागताला विमानतळावर हजर झाले होते. शिवाय, आणीबाणीला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर तुम्ही आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘समविचारी’ ठरल्याने वातावरण पालटून गेले ते वेगळेच.

 

नंतरची सुमारे चार दशके मायस्थेनिया ग्रेव्हीससारख्या दुर्धर आजाराशी सामना करत, महागडे उपचार करत तुम्ही कसे जगलात ते जगजाहीर आहे. तुमच्यावर लाचारीचा, तडजोडीचा आरोप करणाऱ्यांना लाख करू देत. पण तुम्ही मतांची दलाली करत सौदेबाजी केली नाही. योग्यता असूनही संसदीय राजकारणात शिरकावासाठो धडपड केली नाही. स्वतःची साहित्यिक म्हणून असलेली महती, ख्याती, जागतिक कीर्ती या एकमेव भांडवलावर तुम्ही अक्षरशः हाताने कमवायचे अन पानावर खायचे असे बेभरवशाचे आयुष्य अखेरपर्यंत जगलात! पण दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करण्याचा परिपाठ कधी बिघडू दिला नाही. तुमची साहित्य क्षेत्रातील महान कामगिरी ही पद्मश्रीच्या नव्हे, खरे तर नोबेलच्या योग्यतेची होती.

 

अन कार्यकर्त्यांचे लाड करणाऱ्या, सहकाऱयांना, मित्रांना आवडीचे वाटेल ते मनसोक्त खाऊ पिऊ घालुन त्या आत्मिक आनंदाने तृप्त होणाऱ्या नामदेव दादांना कोणता पँथर विसरू शकेल? ‘ ये sss दिवाकर आलाय, सिग कबाब आणि लंबे पाव मागव लवकर’ असे फर्मान तुम्ही मल्लिकाताईंना सोडायचे. आजारामुळे हाताने लिहिणे अवघड व्हायचे, तेव्हा तेव्हा लेख, निवेदने,पत्रे तयार करून घ्यायला तुम्ही मला वरचेवर बोलावून घेत असत.

 

छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याने सुनावलेल्या आपल्या चुका निमूटपणे ऐकून घेणारा, त्या चुका खुल्या दिलाने मान्य करणारा तुमच्यासारखा निगर्वी आणि अहंकारमुक्त नेता आंबेडकरी चळवळीत दुसरा शोधून सापडणार नाही. तुम्हाला कोणी लाख कम्युनिस्ट ठरवले तरी हिंसा, सूड, मत्सर, द्वेष,असूया अशा विकारांपासून तुम्ही मुक्त होता. बुद्ध विचारांनी संस्कारित झालेल्या सुसंस्कृत मनाचा विरळ नेता होता तुम्ही.

 

नामदेव दादा, आजच्या स्मृती दिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन…..💐💐💐💐💐

 

(दिवाकर शेजवळ हे ज्येष्ठ पत्रकार असून सामाजिक क्षेत्रातही ते दलित चळवळीतील विविध संघटनांच्या माध्यमातून सक्रिय होते. सध्या ते ‘आंबेडकरी संग्राम’चे नेतृत्व करतात.)


Tags: Divakar ShejwalNamdev Dhasalआंबेडकरी संग्रामदिवाकर शेजवळनामदेव ढसाळ
Previous Post

नवी मुंबई मेट्रोची १८ जानेवारीला सुरक्षाविषयक चाचणी

Next Post

खासदार संभाजी छत्रपतींची भूमिका: “छत्रपतींच्या गड-किल्ल्यांची नावे द्या, पण वागणूकही साजेशी राखा!”

Next Post
sambhaji chhatrapati

खासदार संभाजी छत्रपतींची भूमिका: "छत्रपतींच्या गड-किल्ल्यांची नावे द्या, पण वागणूकही साजेशी राखा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!