Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुबईचा भगिरथ प्रयत्न…वाळवंटात बहरणार हिरवळ!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
dubai

मुक्तपीठ टीम

 

ऐकताना मजेशीर वाटते, मात्र वाळवंटातील देश दुबईला आता अर्ध्यापेक्षा जास्त भाग हिरवागार करायचा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दुबई अर्बन मास्टर प्लॅन २०४० नुसार, वाळवंटातील दुबईचा ६०% भाग हिरवागार करायची सरकारची योजना आहे. दुबई हे राहण्यासाठी व कामासाठी जगातील सर्वात सुंदर शहर करायच्या उद्देशाने एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. राजे शेख मोहंमद बिन राशिद अल मकतूम, पंतप्रधान व दुबईच्या प्रशासकांनी हा मास्टर प्लॅन जाहीर केला आहे.

 

२००८ पर्यंत दुबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या ८ टक्के भागातही हिरवळ नव्हती. परंतु २०२० पर्यंत शहरी भागाचा ३५% भागांवर हिरवळ दिसू लागली. पण हा शहरी भाग दुबईच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ २०% आहे. आता ६० टक्के भागा हिरवागार करण्याच्या योजनेत दुबईतील शहरी भाग वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे.

 

यासाठी संसाधनांचा अधिकाधिक उपयोग हा निरोगी आणि सर्वसमावेशक समुदाय विकासासाठी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. हिरवळ, विश्रांतीच्या जागा आणि सार्वजनिक उद्याने दुप्पट केली जातील. २०४०पर्यंत दुबईची लोकसंख्या वाढून ५८ लाख होण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेऊन हिरवळ वाढविण्याची योजना आहे.

  • अमीरातच्या एकूण क्षेत्रापैकी ६०% निसर्ग आणि ग्रामीण नैसर्गिक क्षेत्रांचा वाटा असेल.
  • निवासी भाग व कार्यस्थळांना जोडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केले जातील, जे पादचारी आणि सायकल चालकांसाठी सोयीचे असतील.
  • हॉटेल आणि पर्यटनासाठीच्या भूभागात १३४% वाढ होईल.
  • शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठीच्या भूभागात २५% वाढ होईल, तर सार्वजनिक समुद्रकिनार्‍यांची लांबी ४००% पर्यंत वाढेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Dubaiअमीरातदुबईवाळवंट
Previous Post

लसींचा रासपुतिन डान्सही होत आहे जबरदस्त व्हायरल

Next Post

‘लिंक्डइन’च्या कर्मचाऱ्यांना रिचार्ज होण्यासाठी खास सुट्टी

Next Post
linkedin

'लिंक्डइन'च्या कर्मचाऱ्यांना रिचार्ज होण्यासाठी खास सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!