मुक्तपीठ टीम
नोएडाच्या उंच ट्विन टॉवरचे आता ढिगाऱ्यात रूपांतर झाले आहे. एक बटण दाबताच, या टॉवरचा नाहीनाट झाला आणि याचे धूळीत रूपांतर झाले. अवघ्या १०-२० सेकंदांमध्ये स्फोटांनी टॉवर जमीनदोस्त करण्यात आले. नोएडा पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण योजना तयार करण्यात आली आणि टॉवर पाडण्यात आला. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था असल्याने सर्व काही सुरळीत पार पडले. हा टॉवर बांधण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या ट्विन टॉवरचा ढिगारा वाया जाणार नाही नोएडाच्या सेक्टर ८० ट्रीटमेंट प्लांटमध्ये तो वापरण्यायोग्य केला जाईल.
सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर पाडण्याच्या निर्णयाबाबत सर्वसामान्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काही लोकांच्या मते हा योग्य निर्णय होता, तर काहीजण या निर्णयाला विरोध करतानाही दिसले. ट्विन टॉवर्सच्या विध्वंसानंतर साचलेली धूळ स्थिर करण्यासाठी पाणी फवारण्यासाठी अँटी स्मॉग गन वापरल्या जात आहेत. ट्विन टॉवर्स कोसळल्यानंतर आजूबाजूला धुळच-धूळ पसरली.
जवळपासच्या सोसायट्यांचे कोणतेही नुकसान झाले नाही
- नोएडा प्राधिकरणाच्या सीईओ रितू माहेश्वरी यांनी सांगितले की, लगतच्या गृहनिर्माण सोसायट्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
- काही डेब्रिज नुकतेच रस्त्यावर आले आहे.
- ट्विन टॉवरच्या ढिगाऱ्यातून किमान २८ हजार मेट्रिक टन बांधकाम केले जाईल.
ट्विन टॉवर स्फोटामुळे त्यांच्या चालू असलेल्या कोणत्याही प्रकल्पाच्या बांधकामावर परिणाम होणार नाही. उर्वरित इमारतींचे बांधकाम सुरू राहणार आहे. असे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले.
ट्विन टॉवर्सचा विध्वंस फसवणूक करणाऱ्यांसाठी एक उदाहरण ठरणार!
सेक्टर १३५चे सुनील मिश्रा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्या सर्वांना धडा शिकवतो जे कायदा हलक्यात घेतात आणि पैसे कमावण्यासाठी नियमांची पायमल्ली करतात. अशा लोकांकडून घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होते, त्यामुळे हा निर्णय योग्य होता. यूपी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ट्विन टॉवर्सभोवती सहाहून अधिक तात्पुरत्या मशीन्स बसवल्या आहेत. त्यांच्या मदतीने हे मंडळ ३१ ऑगस्टपर्यंत वायू प्रदूषणावर लक्ष ठेवणार आहे.
ट्विन टॉवर उभारण्यासाठी ५०० कोटींचा खर्च करण्यात आला
सुपरटेक लिमिटेडचे अध्यक्ष आर के अरोरा म्हणाले की, एपेक्स आणि केयेन नावाच्या या दोन टॉवर्समध्ये स्टील, सिमेंट, वाळू, मजूर, कर्ज आणि इतर खर्चासह बांधकाम साहित्यावर ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
“पैसा वाया घालवण्याऐवजी ट्विन टॉवरचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये करता आले असते”
- अॅक्टिव सिटीजन टीमचे संस्थापक सदस्य आलोक सिंह म्हणाले, “आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण बांधकामावर खर्च होणारा पैसा वाचवण्यासाठी ही इमारत सरकारच्या ताब्यात द्यायला हवी होती.
- या टॉवरमध्ये शहरातील बेघर लोकांचे पुनर्वसन सरकार करू शकते.
- एवढा पैसा वाया घालवण्याऐवजी ट्विन टॉवरचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये करता आले असते.”