Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिगरेट, बिडी, गुटखा या कर्करोगकारी उत्पादनांवर ७५ टक्के कराची मागणी!

डॉक्टर, अर्थतज्ज्ञ, जनआरोग्य गटांची जीएसटी कॉन्सिलकडे मागणी

September 6, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
tax

मुक्तपीठ टीम

डॉक्टर, अर्थतज्ज्ञांसह सार्वजनिक आरोग्य संघटनांनी तंबाखु खाण्यापासुन सर्वांना परावृत्त करण्यासाठी जीएसटी कौन्सिलला तंबाखू उत्पादनांवर टॅक्स वाढवण्याची विनंती केली आहे. १७ सप्टेंबर रोजी या परिषदेची बैठक होणार आहे. तंबाखू उत्पादनांमधुन मिळणारा महसुल महामारीच्या काळात संसाधनांच्या वाढलेल्या गरजांमध्ये मोठे योगदान देऊ शकतो. संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी लसीकरण आणि आरोग्याशी निगडित पायाभुत सुविधांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत योग्य ठरेल.

 

तंबाखूवरील कर आहे तितकाच

  • जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागु झाल्यापासुन तंबाखुवरील करात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही.
  • जनआरोग्य गटांनी निवेदनाद्वारे याकडे लक्ष केंद्रित केले.
  • सर्व तंबाखु उत्पादने गेल्या तीन वर्षांमध्ये अधिक लोकांसाठी उपलब्ध झाली आहेत.
  • सिगारेटसाठी फक्त ५२.७ टक्के आहे.
  • बिडीसाठी २२ टक्के कर आहे.
  • इतर तंबाखू उत्पादनांसाठी ६३.८ टक्के आहे.

 

तंबाखुचा वापर कमी करण्यासाठीची युक्ती

  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केलेल्या कराच्या लिमिट पेक्षा हे खुप कमी आहे.
  • तंबाखू उत्पादनांना किरकोळ किंमतीच्या किमान ७५ टक्के कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
  • डब्ल्यूएचओच्या मते, कर वाढवुन तंबाखुची किंमत वाढवणे हा तंबाखूचा वापर कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
  • तंबाखू ची किंमत इतकी जास्त असावी की लोकांना ते परवडणार नाही.
  • ही स्थिती लोकांना तंबाखु सोडुन देण्यास भाग पाडेल.
  • जी तंबाखू सेवन करत नाहीत ते सुरू करण्या आधी किमतीचा विचार करतील आणि जे सेवन करतात त्यांचा वापर कमी होईल.

ग्रुपचा भाग असलेल्या लखनौ विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक अरविंद मोहन म्हणाले की, तंबाखू उत्पादनांवर सर्व प्रकारचे कर आणि उपकर त्याच्या किरकोळ किंमतीच्या ७५ टक्के इतका केला पाहिजे. व्हॉलेंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भावना मुखोपाध्याय म्हणाल्या की, करात वाढ केल्याने तंबाखुजन्य पदार्थ महाग होतील आणि त्यामुळे तरुण पिढी या व्यसनास बळी पडण्यापासून वाचेल.

 

तंबाखुमुळे कोरोनाचा गंभीर संसर्ग होतो

  • टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील नेक कॅन्सरचे मुख्य सर्जन डॉ.पंकज चतुर्वेदी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले.
  • तंबाखुमुळे गंभीर कोरोना संसर्गाचा धोका आणि त्याच्या उपचारामधील गुंतागुंत वाढते.
  • धुम्रपानामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता बिघडते आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.
  • कोरोना झाल्यानंतर तंबाखुचे सेवन करणाऱ्यांसाठी मृत्यूचा धोका वाढला आहे.

Tags: GSThealthhealth awarenesstaxtobacco productsआरोग्यजीएसटीतंबाखू उत्पादनधूम्रपानमुक्तपीठ
Previous Post

“रस्ते सुधारले, वापरणारे लोक नाहीत! १२० किमीपर्यंत वेगमर्यादा वाढवणं चूकच!”

Next Post

गरीब श्रीमंताच्या मालमत्तेत किती ही दरी…१० टक्क्यांकडे कोट्यवधी तर गरीबांकडे दोन हजार!

Next Post
poor rich

गरीब श्रीमंताच्या मालमत्तेत किती ही दरी...१० टक्क्यांकडे कोट्यवधी तर गरीबांकडे दोन हजार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!