Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राजधानी दिल्लीत दंगल : भीती असूनही पोलिसांचा गुप्तचर विभाग गाफिल का राहिला?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Delhi Voilance

मुक्तपीठ टीम

शनिवारी देशात सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्सव होता. अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पठण, महाआरती सुरु होती. असं असताना राजधानी दिल्लीमध्ये मात्र हिसांचाराचं चित्र दिसलं. दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली. जमावाकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक पोलीस कर्मचारी यात जखमी झाले. या संपूर्ण घटनेची माहिती आधीच पोलिसांना माहित पडली होती मात्र त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. हे दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अपयश असल्याचे म्हटले जात आहे.

 

दंगल सुनियोजित…

  • दिल्लीच्या जहांगीरपूरी येथील मिरवणुकीत सहभागी लोकांवर हल्ला केल्यानंतर सुमारे ५०० मीटरपर्यंत काचा, दगड, विटा रस्त्यावर विखुरल्या होत्या.
  • एवढ्या प्रमाणात काचेच्या बाटल्या आणि दगड आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
  • दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जहांगीरपुरीच्या सी-ब्लॉकमधील धार्मिक स्थळाजवळून मिरवणूक जात असताना गोंधळ झाला.
  • येथे दोन्ही बाजूच्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली.
  • गोंधळ सुरू होताच सगळीकडे चेंगराचेंगरी झाली.
  • लोक आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते.
  • कट रचून हिंसाचार घडवण्यात आला.
  • एका समाजातील काहींनी आधीच शस्त्रे, बाटल्या आणि दगड गोळा केले होते.
  • ही दंगल सुनियोजित होती, असा तिथल्या स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.

 

नेमकं काय घडलं जहांगीरपुरीत?

  • दिल्लीतील जहांगीरपुरी भागात आज हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.
  • शोभायात्रेला मोठी गर्दी होती.
  • दरम्यान, ही शोभायात्रा सुरू असतानाच दोन समुदायातील घटक आमनेसामने उभे ठाकले.
  • त्यात दगडफेक व जाळपोळीच्या घटनेने वातावरण चिघळले.
  • जमावाकडून झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत.
  • त्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
  • खबरदारी म्हणून या भागात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री केजरीवालांचे शांतता राखण्याचे आवाहन…

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
  • त्यांनी या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
  • केंद्र सरकार आणि त्याअंतर्गत असलेल्या दिल्ली पोलिसांनी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे सांभाळावी, असे ते म्हणाले.
  • सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.

Tags: delhiHanumanJayantiJahangirpuriजहांगीरपूरीदिल्लीहनुमान जयंती
Previous Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या ८ जागांसाठी भरती

Next Post

मराठा, कुणबी समाजांसाठी ‘सारथी’ ठरू शकते वरदान! समजून घ्या कसं…

Next Post
SARTHI AND MARATHA KRANTI MORCHA

मराठा, कुणबी समाजांसाठी 'सारथी' ठरू शकते वरदान! समजून घ्या कसं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!