मुक्तपीठ टीम
शनिवारी देशात सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्सव होता. अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पठण, महाआरती सुरु होती. असं असताना राजधानी दिल्लीमध्ये मात्र हिसांचाराचं चित्र दिसलं. दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली. जमावाकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक पोलीस कर्मचारी यात जखमी झाले. या संपूर्ण घटनेची माहिती आधीच पोलिसांना माहित पडली होती मात्र त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. हे दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अपयश असल्याचे म्हटले जात आहे.
दंगल सुनियोजित…
- दिल्लीच्या जहांगीरपूरी येथील मिरवणुकीत सहभागी लोकांवर हल्ला केल्यानंतर सुमारे ५०० मीटरपर्यंत काचा, दगड, विटा रस्त्यावर विखुरल्या होत्या.
- एवढ्या प्रमाणात काचेच्या बाटल्या आणि दगड आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जहांगीरपुरीच्या सी-ब्लॉकमधील धार्मिक स्थळाजवळून मिरवणूक जात असताना गोंधळ झाला.
- येथे दोन्ही बाजूच्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली.
- गोंधळ सुरू होताच सगळीकडे चेंगराचेंगरी झाली.
- लोक आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते.
- कट रचून हिंसाचार घडवण्यात आला.
- एका समाजातील काहींनी आधीच शस्त्रे, बाटल्या आणि दगड गोळा केले होते.
- ही दंगल सुनियोजित होती, असा तिथल्या स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.
नेमकं काय घडलं जहांगीरपुरीत?
- दिल्लीतील जहांगीरपुरी भागात आज हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.
- शोभायात्रेला मोठी गर्दी होती.
- दरम्यान, ही शोभायात्रा सुरू असतानाच दोन समुदायातील घटक आमनेसामने उभे ठाकले.
- त्यात दगडफेक व जाळपोळीच्या घटनेने वातावरण चिघळले.
- जमावाकडून झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत.
- त्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
- खबरदारी म्हणून या भागात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री केजरीवालांचे शांतता राखण्याचे आवाहन…
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
- त्यांनी या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
- केंद्र सरकार आणि त्याअंतर्गत असलेल्या दिल्ली पोलिसांनी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे सांभाळावी, असे ते म्हणाले.
- सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.