Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीचा क्रिकेटर हनीट्रॅपच्या जाळ्यात… डेटिंग अॅपद्वारे झालेली भेट पडली महागात!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Honeytrap

मुक्तपीठ टीम

दिल्लीत नुकतीच एक खळबळजनक घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी एका क्रिकेटरसोबत घडलेल्या हनीट्र्रॅपिंग प्रकरणाचा शोध घेतला आहे. दिल्लीस्थित क्रिकेटपटूला हनी ट्रॅपिंग, खंडणी आणि ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्रिकेटपटूची प्रतिष्ठा लक्षात घेऊन पोलिसांनी त्याचे नाव उघड केलेले नाही. यासोबतच ऋषभ चंदा, सुभोनकर विश्वास आणि शिव सिंह या तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

हनी ट्रॅपिंग रॅकेटचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीतील एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने डेटिंग अॅपद्वारे महिलेशी संपर्क साधला होता आणि सेक्ससाठी हॉटेलमध्ये भेटही केली होती. हनी ट्रॅपिंग रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्रिकेटपटूला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा कट!

  • मिळालेल्या माहितीनुसार, हा क्रिकेटर ऑक्टोबरमध्ये काही सामने खेळण्यासाठी दिल्लीहून कोलकाता येथे गेला होता आणि त्यादरम्यान सॉल्ट लेक परिसरातील एका पॉश हॉटेलमध्ये क्रिकेटपटूची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
  • या ठिकाणी डेटिंग अॅपद्वारे तो आरोपी महिलेच्या संपर्कात आला आणि हॉटेलमधील महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले.
  • यादरम्यान क्रिकेटपटूचे काही व्हिडीओ आणि फोटोही काढण्यात आले आणि त्या आधारे चार आरोपी क्रिकेटपटूला ब्लॅकमेल करत मोठ्या रकमेची मागणी करत होते.

ब्लॅकमेलिंग केल्यामुळे क्रिकेटपटूने आरोपींच्या खात्यात पैसे जमा केले…

  • आपली सामाजिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी क्रिकेटपटूने नेट बँकिंगद्वारे ६० हजार रुपये चारही आरोपींनी दिलेल्या खात्यात ट्रान्सफर केले आणि सोन्याची चेन आणि मौल्यवान मोबाईल फोन दिला.
  • यानंतर क्रिकेटरला सतत ब्लॅकमेल केले जात होते.
  • अखेर त्यांने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर बागुआटी परिसरातून तीन आरोपींना अटक केली, तर चौथा आरोपी फरार आहे.

Tags: BlackmailingcricketerDating AppdelhiExtortionHoneytrapmuktpeethक्रिकेटरखंडणीघडलं-बिघडलंडेटिंग अॅपदिल्लीब्लॅकमेलिंगमुक्तपीठहनीट्रॅप
Previous Post

२०२२: जगभरात विक्रमी उष्णतेची नोंद, जागतिक हवामान संघटनेचा अहवाल!

Next Post

कर्नाटकातील काँग्रेस नेत्याच्या ‘हिंदू’ शब्दाबद्दलच्या वक्तव्यामुळे वाद

Next Post
Karnataka Former Minister and Congress Working President Satish Jarkiholi

कर्नाटकातील काँग्रेस नेत्याच्या 'हिंदू' शब्दाबद्दलच्या वक्तव्यामुळे वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!