Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली पाहणी  

October 15, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Charni Road Station Railway Bridge

मुक्तपीठ टीम

पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, रेल्वे, मुंबई महानगरपालिका आदी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Charni Road Station Railway Bridge

चर्नी रोड स्थानकातील उत्तर बाजूचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 वर उतरणारा पूल सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. येथे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या परिसराची मंत्री श्री. केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.वर्मा, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

पाहणी केल्यानंतर केसरकर म्हणाले, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना करण्यात येईल. याबरोबरच सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल पडल्यानंतर मुंबईतील धोकादायक असलेले पूल नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात येऊन पाडण्यात आले. चर्नी रोड हा मूळ मुंबईतील मुख्य भाग आहे. येथे प्रवाशांची संख्या लक्षात घेता तातडीची उपाययोजना म्हणून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Charni Road Station Railway Bridge

डोंगरी, भायखळा पोलीस वसाहतीची पाहणी

डोंगरी तसेच भायखळा भागातील सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या पोलीस वसाहतींची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी वसाहतीतील पोलीस कुटुंबियांशी संवाद साधून इमारतींच्या दुरूस्तीचे काम येत्या दोन महिन्यात सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या इमारतींच्या नूतनीकरण आणि दुरूस्तीचे काम दर्जेदार व्हावे, प्रत्येकाला त्यांच्या घरात शौचालय मिळावे, आता असलेल्या एकत्रित शौचालयाच्या जागी जिम, योगा करता येतील अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार अमीन पटेल, डोंगरी येथे पोलीस उपायुक्त हरी बालाजी, भायखळा येथे पोलीस उपायुक्त योगेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील, उपअभियंता एन.सी.पाटील आदी उपस्थित होते.


Tags: Charni Road StationCharni Road Station Railway BridgeGovernment NewsGuardian Minister Deepak KesarkarmuktpeethWestern Railwayघडलं-बिघडलंचर्नी रोड स्थानकचर्नी रोड स्थानक रेल्वे पुलपश्चिम रेल्वेपालकमंत्री दीपक केसरकरमुक्तपीठसरकारी बातमी
Previous Post

तंत्रनिकेतनच्या उन्हाळी २०२२ फेरपरिक्षेचा निकाल जाहीर, फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना लाभ- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

पाकिस्तानात रुग्णालयाच्या छतावर सडत होते २०० मृतदेह! अवयवही गायब!!

Next Post
Pakistan Deadbodies

पाकिस्तानात रुग्णालयाच्या छतावर सडत होते २०० मृतदेह! अवयवही गायब!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!