Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्याचा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

December 14, 2022
in घडलं-बिघडलं
0
जलयुक्त शिवार योजना

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने शेतीसाठी उपयुक्त ठरलेली जलयुक्त शिवार ही महत्त्वाची योजना पुन्हा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून आपण या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भाग आणि शेतीच्या विकासासाठी जलयुक्त शिवार ही अत्यंत कल्पक आणि प्रभावी योजना सुरू केली. जनतेच्या सहभागातून ही योजना यशस्वी ठरली. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी राखण्यास मदत झाली आणि सिंचनाच्या क्षमतेत वाढ झाली. तथापि, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीने विजय मिळविला असताना विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार या अत्यंत उपयुक्त योजनेला स्थगिती दिली. ही योजना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. तथापि, आता पुन्हा ही योजना सुरू होत असल्याने ग्रामीण भाग आणि शेतीला लाभ होणार आहे. आपण या निर्णयाबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो.

त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५,००० पदांच्या भरती प्रक्रियेला चालना देण्याचा निर्णय राज्यातील युवक युवतींसाठी आश्वासक आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसृष्टी प्रकल्पाला पन्नास कोटी रुपये अनुदान देणे आणि वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात साठ टक्के वाढ करणे हे निर्णय स्वागतार्ह आहेत.


Tags: BJP State President Chandrashekhar BawankuleJalyukta Shivar YojanaMaharashtraजलयुक्त शिवार योजनाभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलमहाराष्ट्र
Previous Post

मेकॉन लिमिटेडमध्ये ‘इंजिनीअर आणि एक्झिक्युटिव्ह’ पदांवर १६५ जागांवर नोकरीची संधी

Next Post

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? घ्या जाणून थोडक्यात…

Next Post
Maharashtra Cabinet Decision

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? घ्या जाणून थोडक्यात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!