Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय सागरी क्षेत्रात शांततेसाठी भारतीय नौदल सुरक्षाविषयक भागीदार – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

भारतीय नौदलाच्या २२ व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वॉड्रनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'प्रेसिडेंटस स्टॅंडर्ड' प्रदान

December 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
Hon President at Navy Prog 2

मुक्तपीठ टीम

जागतिक सागरी व्यापाराचा मोठा वाटा भारतीय सागरी क्षेत्रातून होतो, त्यामुळे या क्षेत्रात शांतता राखणे केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज, जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाकडे आपले सागरी शेजारी हिंद महासागर प्रदेशातील एक पसंतीचे सुरक्षाविषयक भागीदार म्हणून अपेक्षेने पाहत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  केले.

Hon President at Navy Prog 3           

मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  ‘२२ वी वेसल स्क्वॉड्रन‘ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला प्रेसिडेंट‘स स्टॅंडर्ड हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. लेफ्टनंट युध्दी सुहाग यांनी ‘२२ वी वेसल स्क्वॉड्रन, या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला दिलेला प्रेसिडेंट‘स स्टॅंडर्ड पुरस्कार राष्ट्रपतींकडून स्वीकारला. या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांचेसह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या समारंभाच्या गौरवार्थ भारतीय टपाल विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल कव्हरचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले.

            

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, वीर आणि प्रबल वर्गाच्या जहाजांचा समावेश करुन ‘किलर स्क्वॉड्रन‘  सतत विकसित होत आहे. या प्रबल वर्गाची जहाजे भारतात बांधली गेली आहेत, ही आनंदाची बाब असून ती स्वदेशीकरणाप्रती नौदलाची वचनबद्धता आणि ‘आत्मनिर्भर भारता’प्रती भारतीय नौदलाची दृष्टी दर्शविते. १७ व्या शतकात भारतात युद्धासाठी सज्ज अशा नौदलाची उभारणी करणारे, नौदलाचे संस्थापक, द्रष्टे राजे म्हणून ज्यांचा गौरव होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. 

            

प्रारंभी राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी ‘२२ वी किलर स्क्वॉड्रन्स‘ या तुकडीतील सर्व ज्येष्ठ तसेच, सेवेत असलेल्या जवानांनी देशासाठी केलेल्या महान सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करुन सर्वोच्च बलिदान देणारे शूर खलाशी आणि अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

            

देश ‘स्वर्णिम विजय वर्ष‘ साजरे करीत असतानाच ‘२२ वी किलर स्क्वॉड्रन्स‘ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला प्रेसिडेंट‘स स्टॅंडर्ड हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे, ही अतिशय योग्य वेळ असून या तुकडीने केलेले कार्य हे भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील अधिकारी-खलाशी यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेची साक्ष आहे. २२ व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वाड्रनने गेल्या पाच दशकांमध्ये अविरत, अखंडित असा प्रवास केला आहे. १९७० मध्ये सोव्हियत रशियाकडून वेसल स्क्वॉड्रनने ओएसए एक वर्गाची आठ जहाजे समाविष्ट करुन या स्क्वॉड्रनचा गौरवशाली इतिहास सुरु झाला. या स्क्वॉड्रनचा वेग आणि फायर पॉवरसाठी प्रसिद्ध असलेल्या या जहाजांनी १९७१ च्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याच युद्धात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात केलेल्या यशस्वी नौदल कारवायांच्या स्मरणार्थ चार दिवसांपूर्वी आपण नौदल दिन साजरा केल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

Hon President at Navy Prog 1           

‘ऑपरेशन्स ट्रायडंट‘ आणि ‘पायथन‘द्वारे आपल्या जहाजांनी पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांना पश्चिमेकडील समुद्रात बुडवले आणि शत्रूच्या युद्धाच्या प्रयत्नांना मारक झटका दिल्याचे पाहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी, या किलर स्क्वाड्रन जहाजांनी कराची बंदर जाळत, शत्रूचे मनोबल खच्ची केले. कराचीवर नाकेबंदी केली आणि संपूर्ण समुद्रावर नियंत्रण मिळवले. या युद्धनौका आपल्या नौदलासाठी युद्धातील सर्वात शक्तिशाली लढावू ताकद ठरल्या आहेत. राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान प्रदान करणे म्हणजे या तुकडीच्या विद्यमान आणि माजी अधिकारी तसेच नाविकांनी राष्ट्राप्रती केलेल्या अतुलनीय सेवा आणि समर्पणाला दिलेली पावती असल्याचेही रामनाथ कोविंद यावेळी म्हणाले.

            

आपले राष्ट्र हे सागरी राष्ट्र असून देशाचे  परराष्ट्र धोरण पुढे नेण्यात आणि आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे आणि व्यावसायिक हितांचे रक्षण करण्यात आपल्या नौदलाची मोठी भूमिका आहे. भारतीय नौदल आपल्या व्यापक सागरी हितांचे यशस्वीपणे रक्षण करत असल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

            

देशात आणि देशाबाहेर मानवी संकटे किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करण्यातही भारतीय नौदल आघाडीवर आहे, कोरोना च्या संकटात भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात तसेच तौक्ते चक्रीवादळादरम्यान बचाव कार्यातही भारतीय नौदलाने अतिशय महत्वाची भूमिका बजावली, याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नौसेनेच्या कार्याचे कौतुक करुन ‘२२ वी किलर स्क्वॉड्रन्स‘ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            

प्रारंभी सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर तथा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नौदलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. नौदलाच्या ‘चेतक‘ सह विविध हेलिकॉप्टर्सनी यावेळी कसरती करुन नौदलाच्या शक्तीचे प्रदर्शन घडवले त्यांनी समुद्रातील शोध मोहिम, बचाव कार्य आदींची प्रात्याक्षिके केली. यावेळी ‘२२ वी वेसल स्क्वॉड्रन्स‘ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीसाठी  विविध धर्मांच्या धर्मगुरूंकडून विशेष प्रार्थना करण्यात आली


Tags: २२ वी वेसल स्क्वॉड्रन22nd Vessel SquadronPresident Ramnath KovindPresident's Standard Awardनेव्हल डॉकयार्डप्रेसिडेंट'स स्टॅंडर्डमुंबईराष्ट्रपती रामनाथ कोविंद
Previous Post

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदाच्या २२ जागांसाठी भरती, एमपीएससीकडे अर्ज करा!

Next Post

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न केले जाणार

Next Post
कोविड परिस्थितीबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा 1

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न केले जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!