मुक्तपीठ टीम
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विसातार झाला. मात्र अजून मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा पार पडायचा आहे. अशातच मंत्रीपद मिळल्यानंतर काही मंत्री प्रसिद्धीसाठी घोषणा करत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा विचार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत, प्रसिद्धिसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणाऱ्या मंत्र्याना फडणवीसांनी खडेबोल सुनावले.
देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना झापलं!!
- माध्यमांनीही योजनेचा आवाका आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन कृषी विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त चालवलं.
- मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना संबंधित योजनेची माहिती नसताना तुम्ही कसा काय निर्णय जाहीर करु शकता? असा प्रश्न करत फडणवीसांनी सत्तारांना चांगलचं झापलं.
- कोणताही सारासार विचार न करता घोषणा करु नका.
- कोणताही निर्णय परस्पर जाहीर करु नका.
- मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका, असे खडेबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांना सुनावले आहे.
अब्दुल सत्तारांची सारवासारव!!
- आपण निर्णय घेतला असं म्हणालेलो नाही, पण विचार सुरु असल्याचं माध्यमांना सांगितलं.
- मात्र माध्यमांनी निर्णय घेतल्याचं वृत्त चालवलं.
- मात्र त्यांच्या या वृत्ताने कुणाचंही समाधान झालं नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिली सत्तारांना समज!!
- फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली.
- कोणत्याही योजनेची घोषणा करताना आपण अगोदर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. इथून पुढे कोणत्याही मंत्र्यांनी अशा घोषणा करु नये.