Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माजी खासदार विजय दर्डांसह चार कलाकारांच्या ‘फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनास उपमुख्यमंत्र्यांची भेट

September 2, 2022
in घडलं-बिघडलं
0
‘फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनास उपमुख्यमंत्र्यांची भेट (3)

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही.  कलाकारांच्या  चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते.  साहित्य, कला यातून  साकारलेले समृद्ध विचार आपण कधीच खोडू शकत नाही. ते कायमस्वरूपी मनात राहतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.            

‘फोर स्टोरीज’ कला प्रदर्शनास उपमुख्यमंत्र्यांची भेट (1)

मुंबईत जहांगीर कला दालनात भरविण्यात आलेल्या ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार राज पुरोहित, माजी खासदार विजय दर्डा, अमृता फडणवीस, कलाकार जयश्री भल्ला, रचना दर्डा, बीना ठकरार, लोकमत वृत्तपत्र मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, अनेक कलाकार उपस्थित होते.            

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कला, संस्कृती, चालीरिती यावरून त्या त्या राज्याची ओळख असते. चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते की, किती समृद्ध विचाराने ह्या चित्रकथा रेखाटलेल्या आहेत. कलाकार आपल्या कलेतून  कला, संस्कृती जपत असतो. त्याची किंमत करता येत नाही. याठिकाणी चार कलाकारांनी एकत्रित या प्रदर्शनात विविध चित्रकथा रेखाटलेल्या आहेत.            

माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह वास्तुविशारद जयश्री भल्ला, छायाचित्रकार रचना दर्डा आणि बीना ठकरार यांनी रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.            

माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. ५ सप्टेंबरपर्यंत  सुरू राहणार आहे.


Tags: DCM Devendra fadnavisFormer Mp Vijay dardaFour Storiesmumbaiउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसफोर स्टोरीजमाजी खासदार विजय दर्डा
Previous Post

संतोष बांगरांच्या ‘आमदारगिरी’विरोधात आरोग्य अधिकारी एकवटले! आरोग्य संचालकांशी अर्वाच्च संभाषणाचा आरोप!!

Next Post

अमेरिकेन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Next Post
The American delegation met Deputy Chief Minister Devendra Fadnavis

अमेरिकेन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!