मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी देशातील गरीबी आणि बेरोजगारीवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आर्थिक विषमता हेही देशासाठी आव्हान आहे. यासाठी देशालाही विचार करावा लागेल. देशात गरिबी, बेरोजगारी आहे. कामगार न्यायालयाच्या मते, बेरोजगारी ७.६ टक्के आहे. देशात २० कोटींहून अधिक गरीब आहेत. देशातील असमानता आणि बेरोजगारी ही दोन आव्हाने आहेत ज्यांचा सामना करणे आवश्यक आहे. सरकार्यवाहांनी व्यक्त केलेली चिंता भाजपाच्या अच्छे दिनाच्या दाव्यांना उघडं पाडणारी ठरल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे यांनी स्वदेशी जागरण मंचच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
- आजही २० कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, ही देशासाठी चिंतेची बाब असल्याचेही होसाबोले म्हणाले.
- देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी असून देशातील बेरोजगारीचा दर ७.६% आहे.
जो चिंतेचा विषय आहे.
काँग्रेसने केला हल्लाबोल!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारवाह याच्या विधानावर काँग्रेसने म्हटले की हा भारत जोडो यात्रेचा परिणाम जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकारवाह दत्तात्रेय होसाबोले यांनी बेरोजगारी आणि उत्पन्नातील वाढती असमानता यावर चिंता व्यक्त केली आहे.
- त्याचवेळी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, भारत जोडो यात्रेचा परिणाम बघा, जे देश तोडायला आणि समाजात विष पसरवतात, ते आज गरिबी, बेरोजगारी आणि विषमतेचा मुद्दा उचलून आपली पोहोच वाढवत आहेत.