पालघर जिल्ह्याला अथांग समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून पर्यटनाला महत्त्व प्राप्त व्हावा म्हणून डहाणूमध्ये डहाणू नगर परिषदेच्या माध्यमातून डहाणू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू नगरपरिषद आयोजित डहाणू फेस्टिव्हल हा दोन दिवसांचा होता. पारनाक येथील समुद्र किनाऱ्यावर हा फेस्टिव्हल भरविण्यात आला होता. या महोत्सवात पर्यटनाबरोबरच पालघर जिल्ह्यातील हस्तकला, लोककला, त्याचप्रमाणे उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. या महोत्सवाला हजारो पर्यटकांनी तसेच काही दिग्गजांनीही उपस्थिती लावली होती.