मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लुप्तप्राय झालेल्या काँग्रेसला संजिवनी देण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी कंबर कसली आहे. प्रियंका तर उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसल्या आहेत. त्यांची ‘लड़की हूं लड़ सकती हूं’ या त्यांच्या घोषणेमुळे भाजपालाही महिलांसाठी वेगळ्या कल्पना लढवाव्या लागत आहेत. त्यातच नुकतीच अमेठीत झालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पदयात्रेला जमलेल्या गर्दीने भाजपाची चिंता वाढली आहे. पदयात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी स्मिती इराणी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपाकडून प्रयत्न सुरु केले आहेत. अमेठीवासीयांना आकर्षित करण्यासाठी अब्जावधींच्या पॅकेजच्या घोषणांची शक्यता आहे.
‘लड़की हूं लड़ सकती हूं’ आधी आबादी की राजनीतिक दावेदारी की आवाज है।
मुझे खुशी है कि मेरी बहनें एकजुट होकर इस आवाज को मजबूत बना रही हैं।
‘लड़की हूं लड़ सकती हूं’ शक्ति संवाद, रायबरेली। pic.twitter.com/ldBRjrAz6O
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 19, 2021
गांधी घराण्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यांकडे भाजपाचे लक्ष
जिथं पराभव झाला त्याच अमेठीत राहुल गांधींच्या पदयात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. तिथं गर्दी झाल्यानंतर भाजपा हायकमांडने अमेठी आणि रायबरेलीमध्ये हालचालींना वेग दिला आहे. अटल जयंतीनिमित्त अमेठीत भाजप सरकारकडून १० अब्ज रुपयांच्या योजनांची भेट देण्याची तयारी सुरू आहे. रायबरेली ते जगदीशपूर जाणाऱ्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्मृति इराणींनी वाढवले दौरे
इथे राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सक्रियतेनंतर आता स्मिती इराणींनीही अमेठीत तळ ठोकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिती इराणींच्या २४-२५ डिसेंबरच्या कार्यक्रमानंतर स्मिती वर्षभरानंतर पुन्हा अमेठीला जाऊ शकतात. सध्या स्मिती इराणी केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार आहेत.
२०१९ मध्ये काँग्रेसने गमावला बालेकिल्ला
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा हा मजबूत बालेकिल्ला हिरावला होता.
- २००४ पासून अमेठीतून लोकसभेत जाणारे राहुल गांधी यांचा तेथे पराभव झाला होता.
- त्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच येथे पोहोचले होते.
- अमेठी जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण चार जागा आहेत, त्यापैकी एक जागा राखीव आहे.
- गेल्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला येथे एकतर्फी विजय मिळाला होता.