Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीएसटी ते कल्याण जलद मार्गावर ‘गारेगार ’लोकल!

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची माहिती

December 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
Anil lahoti

मक्तपीठ टीम

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या जलद मार्गावरही एसी लोकल सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी पत्रकारांना दिली.

 

सध्या सीएसएमटी ते कल्याण या धीम्या मार्गावर तसेच  हार्बर, ट्रान्स हार्बरवर एसी लोकल सेवा दिली जात आहे. परंतू हार्बर, ट्रान्स हार्बरवर या लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान नवीन दोन मार्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर अल्प प्रतिसाद मिळणारी लोकल सेवा या नव्या मार्गावर वळवण्याचा विचार आहे, असे लाहोटी म्हणाले. या लोकल सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर चालवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या सेवा नव्या मार्गावर चालवल्यास त्याला प्रतिसाद मिळू शकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

 

गेल्या काही वर्षांपासून मेल व एक्स्प्रेस गाड्या  स्वतंत्र मार्गाने जातात.  मात्र लोकलचे वेळापत्रकही वेळेवर असलेच पाहिजे, अशी प्रवाशांची ब-याच वर्षांपासून मागणी होती. मध्य रेल्वे प्रशासाने प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते दिवा पाचवा, सहाव्या मार्गाच्या कामांना गती दिली आहे. मार्च २०२२ पर्यंत ही नवीन रेल्वे मार्गिका पूर्णत्वास जाणार आहे.
जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २४ ते ७२ तासांचे ब्लॉक पाचव्या आणि सहाव्या मार्गांवरील विविध कामे पूर्ण करण्याकरीता येत्या जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २४ ते ७२ तासांचे ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्याची पूर्वतयारी मध्य रेल्वेने सुरु केली आहे. येत्या २ जानेवारी २०२२ मध्ये २४ तासांचा, त्यानंतर ३६ तासांचा ब्लॉक होणार आहे, असे रेल्वे सुत्रांकडून कळते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ७२ तासांचा मेगाब्लॉक असेल. त्याचा जास्त फटका असंख्य लोकल फे-यांसह मेल, एक्स्प्रेसना बसून त्या  रद्द करण्यात येतील. नव्या २ मार्गिका उपलब्ध झाल्यावर सीएसएमटी ते कल्याण,खोपोली, कसारा मार्गावर जास्तीत जास्त ८० लोकल फे-या वाढणार आहेत, असे अनिल कुमार लाहोटी यांनी म्हणाले. मात्र या फे-या वातानुकूलित असतील. ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मागार्साठी गेल्या रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता.


Tags: ac localcstkalyanकल्याणसीएसटी
Previous Post

मुंबईतील अत्तर कंपनीवर आयकर धाडी! यूपीत मालकाकडे सापडला शेकडो कोटींचा काळा पैसा! नाव ‘समाजवादी’!

Next Post

अमेठीत राहुल आणि प्रियंका गांधींसाठी गर्दी! भाजपाची चिंता वाढली!! होणार अब्जावधींच्या घोषणांची पेरणी!!!

Next Post
priyanka and rahul amethi lyaly

अमेठीत राहुल आणि प्रियंका गांधींसाठी गर्दी! भाजपाची चिंता वाढली!! होणार अब्जावधींच्या घोषणांची पेरणी!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!