मुक्तपीठ टीम
लसींच्या तुटवड्यामुळे देशभरात लसीकरण खोळंबते आहे. १८ ते ४४ वयोगटातील युवावर्गाच्या लसीकरणाची घोषणा केंद्र सरकारने केली पण त्यासाठी राज्य सरकार तयार असूनही लस उत्पादकांकडे लसी नाहीत. मात्र, आता कोविशिल्डच्या ५० लाख लसींचा साठा आता ब्रिटनला पाठविला जाणार नाही. त्याऐवजी या लसींचा वापर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना देशात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमात करता येणार आहे. सीरम इंस्टिट्यूटने पत्राद्वारे ब्रिटनसाठी ठेवलेला लसींचा साठा भारतात वापरण्याची परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने ती परवानगी दिल्यानंतर सीरम आता त्या लसी राज्य सरकारांना पुरवणार आहे. दरम्यान, तरुणांना देण्यात येणाऱ्या लसीवर जर कोविशिल्ड ऐवजी ‘कोविड -१९ व्हॅक्सिन अॅस्ट्राजेनेका’ असे लेबल दिसले तरीही लस घेताना काळजी नको, ती कोविशिल्डच आहे. ती ब्रिटनला निर्यातीसाठी बनवण्यात आल्याने तिच्यावर त्या देशातील ब्रँडनेम आहे.
तरुणाईसाठी कोविशिल्डचे ५० लाख डोस
• कोविशिल्डची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करते.
• सीरमचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी नुकतेच केंद्र सरकारला पत्र लिहून लस ब्रिटनला न पाठविण्याची परवानगी मागितली होती.
• केंद्र सरकारने ही परवानगी देताना ही लस राज्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
• ब्रिटनसाठी ठेवण्यात आलेल्या ५० लाख लसींचा डोस आता देशात वापरला जाणार आहे.
• २१ राज्यांत हे डोस पाठवले जातील.
• काही राज्यांना ३.५ लाख डोस मिळतील. काही राज्यांना एक लाख डोस मिळतील. ५० हजार डोस दोन राज्यात पाठविला जाईल. रा
• ज्यांमधील कोरोना संसर्ग तीव्रता लक्षात घेत सरकारने तिथे पाठवायच्या डोसची संख्या निश्चित केली आहे.
कोविशिल्ड म्हणजेच ‘कोविड -१९ व्हॅक्सिन अॅस्ट्राजेनेका’
• सीरमला लसींची निर्यात ब्रिटनला करायची होती, म्हणून त्यांना कोविशिल्डऐवजी ‘कोविड -१९ व्हॅक्सिन अॅस्ट्राजेनेका’ असे लेबल लावले गेले आहे.
• आता सरकारने राज्यांना कंपनीशी थेट संपर्क साधून डोस खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे.
• सीरम संस्थेने यापूर्वी २३ मार्च रोजी ब्रिटनला ५० लाख डोस पाठविण्यास सरकारकडे परवानगी मागितली होती. सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की, अॅस्ट्राजेनेकाबरोबर त्यांचा करार आहे.
• हे डोस पाठविणे आवश्यक आहे आणि देशातील पुरवठ्यास त्रास होणार नाही.
कोविशिल्ड कोरोनाविरोधात प्रभावी!
• कोविशिल्ड ही एक विषाणू वेक्टर लस आहे.
• ही कोरोना विषाणूप्रमाणेच स्पाइक प्रोटीन तयार करण्यासाठी चिंपांझीमध्ये आढळलेल्या अॅडेनोव्हायरस ChAD0x1 चा वापर करते.
• त्यामुळे शरीरात कोरोनाविषाणूपासून संरक्षण विकसित होते.
• कोविशिल्ड लसीचे दोन डोस घ्यावे लागतात.
• दोन डोस दरम्यान ४२ ते ५६ दिवसांचे अंतर ठेवले पाहिजे.