मुक्तपीठ टीम
विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेल्या निधीत घोटाळ्याचा आरोप असलेल्या किरीट सोमय्यांमागोमाग त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.या प्रकरणी एका निवृत्त सैनिकाने मुंबई पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यात किरीट आणि नील सोमय्या आरोपी आहेत.
निवृत्त सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोप केलेली घोटाळ्याची रक्कम ही ५७ कोटी एवढी प्रचंड असल्यानं ते प्रकरण मुंबई आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवण्यात आले. या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुलासह न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर गेले तीन दिवस ते गायब असल्याची चर्चा सुरु आहे. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला. त्यामागोमाग आज नील सोमय्या यांचाही अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता पोलिसांचा सोमय्या पिता-पुत्रांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस आता त्यांना कधीही अटक करू शकतात.
काय करणार सोमय्या?
आजवर किरीट सोमय्या इतरांवर आरोप करत असत, आता तेच पोलिसांपासून दूर राहत असल्याने त्यांच्याविषयी उलट सुलट चर्चेला उत आला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमय्या पोलिसांसमोर येतील, असा दावा केला असला तरी अद्याप तसं झालेलं नाही. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमय्या यांच्या मुलुंड येथील निवासस्थानाबाहेर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस चिकटवली आहे.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा!
- शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे.
- त्यांनी विक्रांत या युद्धनौकेला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमवल्याचा आरोप केला आहे.
- माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
- त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला आहे.
- त्यात आज न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी आहे.
संजय राऊत यांनी केलं होतं ट्वीट…”सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल”
- आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला, देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल.
- किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे.
- लोकांनी आता गप्प बसू नये.
- जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल.