Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात कोरोनाच्या ट्रिपल म्युटंटचा धोका?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
triple

मुक्तपीठ टीम

 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. डबल म्युटंटनंतर देशात ट्रिपल म्युटंटचा धोका दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगाल मध्ये ट्रिपल म्युटंटचे काही रुग्ण आढळले आहेत. तर आता ट्रिपल म्युटंट म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, “कोरोना विषाणूचे तीन विभिन्न प्रकार एका नव्या रुपात आढळून येणे”, म्हणजेच ट्रिपल म्युटंट होय.

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचे कारण डबल म्युटंट असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढ या राज्यांतून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ट्रिपल म्युटंटची लक्षणे आढळली आहेत. या राज्यांमधून १७ नमुने घेण्यात आले होते. त्या नमुन्यांच्या अहवालातून ट्रिपल म्युटंट असल्याचे निष्कर्षात समोर आले आहे. आता ट्रिपल म्युटंटच्या एन्ट्रीची बातमी पुढे आल्यामुळे या राज्यांची चिंता आणखी वाढली आहे. ट्रिपल म्युटंटबद्दल एका वैज्ञानिकानी सांगितले आहे की, कोरोना विषाणूचा हा एक गंभीर प्रकार ठरु शकतो. विषाणूच्या या नव्या प्रकराला सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे. तसेच जसे विषाणूंमध्ये बदल होत आहे, तसेच लसींमध्येही बदल करणे आवश्यक आहे’.

 

जीनोम सिक्वेंसिंग मोठे आव्हान

  • भारतासाठी नव्या व्हेरीयंटने संसर्ग होणाऱ्या प्रकरणांची जीनोम सिक्वेंन्सिंग हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
  • भारतात आतापर्यंत जेवढी प्रकरणं समोर आली आहेत, त्यातील एक टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणांची जीनोम सिक्वेंसिंग झाली आहे.
  • सध्या भारतात १० लॅबमध्ये जीनोम सिक्वेंसिग केले जात आहे.

यामुळे रुग्ण संख्येत वाढ

  • डबल म्युटंट विषाणू शोधण्यास उशीर झाल्यामुळे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली.
  • जस जसा विषाणू पसरत जातो, तस तसा या विषाणूंमध्ये बदल होत राहतात.
  • भारतात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये डबल म्युटंटची नवी प्रकरणं समोर आली होती.
  • तर आता या दोन राज्यांसह बंगालमध्ये ट्रिपल म्युटंटचे नवीन प्रकरणे वेगाने समोर येत आहेत.

किती घातक ट्रिपल म्युटंट?

  • ट्रिपल म्युटंट हा प्रकार किती घातक आहे, याबद्दल अद्याप संशोधन झालेले नाही.
  • पण डबल म्युटंटच्या संशोधनात असे सिद्ध झाले होते की, हा प्रकार वेगाने पसरत असून यात तरुणांबरोबर लहान मुलांनाही धोका आहे
  • डबल म्युटंट हा पहिल्या विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचे सिद्ध झाले आहे.

 

ट्रिपल म्युटंटबद्दल अधिक संशोधन झाले नसल्याने यावर कोणती लस प्रभावी ठरेल हे सांगणे कठीण आहे, त्यामुळे लसींवर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे ट्रिपल म्युटंटपासून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.


Tags: coronavirusIndiatriple mutationकोरोनाट्रिपल म्युटेंटडबल म्युटेंट
Previous Post

भारतात २४ तासात ९ राज्यांमध्ये कोरोना मृत्यू नाही! ६० टक्के रुग्ण पाच राज्यांमध्ये!

Next Post

महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन होणार

Next Post
uday samant

महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!