मुक्तपीठ टीम
लसीकरणासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. राजकीय नेते स्वत: लस घेतानाची छायाचित्रं प्रसारीत करुनही लोकांना आवाहन करतात. मात्र, त्याचवेळी केरळ पोलिसांनी ट्विट केलेला व्हिडीओ सर्वात वेगळा पण सर्वात प्रभावी ठरला आहे. हा व्हिडीओ आहे सध्या ऑनलाइन सेन्सेशन ठरलेल्या रासपुतिन डांसचा. पण तो डांस माणसांनी नाही तर चक्क कोरोना लसींनी केला आहे.
केरळ पोलिसांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे, ज्यात कोव्हिशिल्ड आणि को-व्हॅक्सिन लस नाचत आहेत. सध्या गाजत असलेल्या बोनी एम.च्या रासपुतीन या गाण्यावर लसी नाचताना दिसत आहेत. या व्हॅक्सिनचा नाचतानाचा हा व्हिडीओ खूप मजेदार असला तरी, व्हिडीओच्या शेवटी एक लस जवळच्या केंद्रात जाऊन नक्की घ्या असा संदेश देण्यात आला आहे. हा अॅनिमेटेड व्हिडीओ व्हायरल करताना, लोकांना कोरोनाची ही साखळी तोडून, आपले पूर्वीच्या आयुष्यात परतण्यास सांगितले आहे.
सध्या रासपुतिन या डान्स चॅलेंजची सोशल मीडियावर चर्चा आहे. फेमस बोनी एमच्या गाण्यावर सूर लावून नाचणार्या लोकांचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्रिचूर मेडिकल कॉलेजच्या जानकी ओमकुमार आणि नवीन के. रज्जाक यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रासपुतिन डान्स चॅलेंज चर्चेत आला. पोलिसांनी नेमकी ती क्रेझ ओळखून तीच कल्पना वापरली. सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर केरळ पोलिसांचा हा व्हिडीओ त्वरित व्हायरल झाला. हे ट्विट २,००० हून अधिक वेळा पाहिले गेले आणि कित्येक लाईक्स मिळाल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होत आहे.
पाहा व्हिडीओ: