मुक्तपीठ टीम
भारतातील कोरोनाविरुद्धचे युद्ध आता एका महाविक्रमाकडे झेपावत आहे. या आठवड्यात देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा १०० कोटींच्या पुढे जाईल. आयएमएफपासून ते जागतिक बँकेने भारताच्या लसीकरणाची गती पाहून आश्चर्य व्यक्त करतानाच कौतुकही केले आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी कोरोना विरूद्धच्या यशस्वी लसीकरण कार्यक्रमासाठी भारताचे अभिनंदन केले आहे आणि ते यशस्वी असल्याचे वर्णन केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी लस उत्पादन आणि वितरणामध्ये आंतरराष्ट्रीय भूमिकेसाठी भारताचे आभार मानले आहेत.
जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक भारताने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये कोरोना लसीची निर्यात थांबवली. जेणेकरून, देशातील संपूर्ण लोकसंख्येला लसीकरण करता येईल. जागतिक बँकेनेही भारताला पाठिंबा देण्याची वचनबद्धता व्यक्त केली. गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी, भारताने परदेशात पुन्हा लसींची निर्यात सुरू करण्याची घोषणा केली होती.
आयएमएफनेही भारताचे केले कौतुक
- आयएमएफने कोरोना महामारी दरम्यान भारताने उचललेल्या पावलांचे कौतुक केले आहे.
- आयएमएफने म्हटले आहे की, महामारीच्या काळात भारताने “जलद आणि मजबूत” पावले उचलली आणि त्याचबरोबर कामगार सुधारणा आणि खाजगीकरण प्रक्रिया चालू ठेवली.
- भारत सरकारने कोरोनाच्या हाताळणीबद्दल, आयएमएफने सांगितले की, लसीकरणाची गती चांगली आणि समाधानकारक आहे.
- सरकारने आर्थिक मदत दिली. समाजातील असुरक्षित घटकांना आर्थिक मदत देण्यात आली.
- आर्थिक धोरण उदारीकृत करण्यात आले, तरतुदी करण्यात आल्या आणि नियामक धोरणे शिथिल करण्यात आली.
World Bank Prez Congratulates India on Successful Covid-19 Vaccination Campaignhttps://t.co/KsXDgbSu1O
via NaMo App pic.twitter.com/h6iAiId0QT
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 18, 2021
पुढील आठवड्यापर्यंत देशात १०० कोटी लसीकरण
- केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी भारत या आठवड्यात कोरोना लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
- गायक कैलाश खेर यांनी लिहिलेले एक कोरोना-राष्ट्रगीत लसींविषयीचे संकोच दूर करण्यासाठी सादर करण्यात आले आहे.
- सोमवारपर्यंत देशातील सुमारे ९७ कोटी ६० लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.