मुक्तपीठ टीम
आरोग्य मंत्रालयाने लोकांना कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दल पुन्हा एकदा सावध केले आहे. आरोग्य मंत्रालयाने आवाहन केले आहेत की, नियमांचे पालन करा. कारण येणाऱ्या काळात आपण थकू, कंटाळू पण हा विषाणू थकणार नाही. अनेकांना वाटतं की कोरोना हा घोटाळा आहे, आम्हाला मास्कची गरज नाही, या पलीकडेही जीवन आहे खरं तर हे चुकीचे आहे. अशा अविचारातूनच जास्त घात होत आहे. आरोग्य मंत्रालयाचे विधान हे लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठीचा एक प्रयत्न मानले जात आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, दोन प्रकारच्या वर्तनामुळे कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. काही लोकांनी शौर्य, ताकद दाखवण्यासाठी चुकीच्या गोष्टी केल्या. काहींनी सर्रास मानले की ‘कोरोना एक घोटाळा आहे’. त्यांच्या त्या अविचारातूनही कोरोना फैलावला.
कोरोनाचा अतिशय जास्त संसर्ग वेग
- दुसर्या लाटेत संसर्ग वाढण्याचे प्रमाण अतिशय वेगवान आहे, ज्यामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर खूप दबाव आला आहे.
- दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात मागील लाटेपेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे.
- लाट गेल्या लाटेच्या तुलनेत राजस्थान, उत्तर प्रदेशात पाच पट जास्त आहे. छत्तीसगडमध्ये साडेचार पट आणि दिल्लीत साडेतीन पट जास्त रुग्णसंख्या आहे.
- कर्नाटक, केरळ, बंगाल, तामिळनाडू, गोवा, ओडिसामध्ये कोरोना प्रकरणांमध्येही वाढती संख्या आहे.