Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले” :एस.एम.देशमुख

May 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
deshmukh

मुक्तपीठ टीम

 

एस.एम.देशमुख यांच्या आत्मक्लेष आदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनास उत्स्फुर्त आणि जोरदार प्रतिसाद मिळाला.. राज्यभर हजारो पत्रकारांनी घरात बसूनच आंदोलन केले आणि दिवसभर अन्नत्याग केला.. पत्रकारांच्या या आगळ्या – वेगळया आंदोलनाची आज राज्यभर चर्चा सुरू होती.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेने काही मागण्या केल्या होत्या.. त्यात सर्व वयोगटातील पत्रकारांना प्राधांन्याने लस द्यावी, पत्रकारांसाठी ऑक्सिजन आणि व्हेटिलेटरची सोय असलेले बेड राखीव ठेवावेत, पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर संबोधावे आणि दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना किमान पाच लाख रूपयांची मदत करावी आदि मागण्याचा समावेश होता.. या मागण्यासाठी पत्रकारांनी इमेल पाठवा आंदोलन देखील केले होते.. मात्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यांच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आत्मक्लेष आंदोलन करण्याचे ठरविले होते.एस. एम.देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभर आत्मक्लेष आंदोलन केले गेले.. त्यात हजारो पत्रकारांनी कोविड चे आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून दिवसभर घरी आंदोलन केले.. दिवसभर अन्नत्याग केला.. स्वतः एस.एम.देशमुख यांनी बीड जिल्हयातील देवडी या गावी असलेल्या “माणिकबाग” या आपल्या फार्मवर आत्मक्लेष आंदोलन केले..
माणिकबागेत माध्यमांशी बोलताना एस.एम.देशमुख यांनी सरकारने पत्रकारांना वारयावर सोडल्याचा आरोप केला.. राज्यात कोरोनानं १२२ पत्रकारांचे बळी घेतले आहेत, ५००० पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत आणि किमान ३०० पत्रकार राज्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत.. सरकारने पत्रकारांची वेळीच काळजी घेतली असती तर एवढ्या मोठ्या संख्येत पत्रकारांचे मृत्यू झाले नसते.. आता वेळ न घालवता सरकारने पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे..आपल्या आत्मक्लेष आंदोलनास पाठिंबा देत पत्रकारांनी राज्यभर आंदोलन करून आपली एकजूट आणि ताकद दाखविलयाबदद देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांचे आभार मानले आहेत..

राज्यात विविध ठिकाणी पत्रकारांनी तहसिलदार, जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांना मागण्यांची निवेदन दिली.. हिंगोलीत पत्रकारांनी धरणे आंदोलन केले..सातारा, बीड, वाशिम, नाशिक आदि अनेक ठाकाणी वरिष्ठांना निवेदन दिली गेली.. पत्रकारांनी एकजूट दाखवत आपली ताकद दाखवून दिल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील सोशल मिडीया सेलचे प्रमूख बापूसाहेब गोरे प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी राज्यातील पत्रकारांचे आभार मानले आहेत..

 


Tags: Anil mahajancoronaअनिल महाजनएस.एम.देशमुखपत्रकारमराठी पत्रकार परिषद
Previous Post

‘कोरोना एक घोटाळा’ या अविचारामुळेही वाढला कोरोना!

Next Post

ऑक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन बॅंक’

Next Post
oxygen

ऑक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांसाठी 'ऑक्सिजन बॅंक'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!