मुक्तपीठ टीम
मुंबई-महाराष्ट्रासह देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोके वर काढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दिवसभरात मुंबईत ७०४ महाराष्ट्रात १ हजार ४५ आणि देशात ४ हजार ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार १७७ एवढी झाली आहे. मनसेचे नेते राज ठाकरेंप्रमाणेच आता आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी आपल्या ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के अध्यक्ष श्री सोनिया गांधी जी कोरोना संक्रमित हुई है , आप शीघ्र स्वास्थ्य लाभ लेकर पुनः जनसेवा में जुटेंगे ऐसी मंगल कामना करता हूँ। #SoniaGandhi pic.twitter.com/reaXnhDZYj
— Jagdish Thakor (@jagdishthakormp) June 2, 2022
सोनिया गांधीमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं!!
- काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या काँग्रेस चिंतन शिबिरात सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या.
- या चिंतन शिबिरामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
- सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी देखील आपली कोरोनाची टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
- सोनिया गांधींना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता.
- त्यामुळे कोरोनाची लक्षणं दिसत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली.
- त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यानंतर सोनिया गांधींना विलगीकरणात ठेवण्यासंदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
- ताप आल्यानंतर सोनिया गांधी ताबडतोब लखनौहून दिल्लीत परतल्या असल्याचे सांगितले जात आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ!
- महाराष्ट्र, केरळ, दिल्लीत पुन्हा एकदा प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
- गेल्या २४ तासांत भारतात ४०४१ नवे कोरोना बाधित आढळले आहेत.
- तसेच गुरुवारी दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू आहे.
- देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार १७७ एवढी झाली आहे.
- सक्रिय रुग्णांची दर ०.०५ टक्के आहे.
- तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७४ टक्के आहे.
- गुरुवारी दिवसभरात २ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत.
- महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १०४५,
- दिल्लीमध्ये ३७३, तामिळनाडू १४५, तेलंगणात ६७, गुजरातमध्ये ५० तर मध्य प्रदेशमध्ये २५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.