मुक्तपीठ टीम
चीनसह जगात अनेक देशांमध्ये कोराना उफाळला आहे. फक्त चीन नाही तर जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर सुरु झाला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली आहे. रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत आणि मृत्यूची संख्या पुन्हा विक्रम मोडत आहे. तर, भारतात मात्र कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण होतेय की वाढ होतेय? काय आहे भारताची आकडेवारी चला जाणून घेवूया.
मृत्यूच्या संख्येत घसरण…
- रविवारी संपलेल्या आठवड्यात देशात कोरोनामुळे केवळ १२ मृत्यूची नोंद झाली आहे.
- गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूची एकही घटना समोर आलेली नाही.
- मार्च २०२० नंतर रोजच्या मृत्यूच्या संख्येत हे सर्वात कमी आहे.
- गेल्या आठवड्यात कोरोनाचे ११०३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
- २३-२९ मार्च २०२० या पहिल्या लॉकडाऊननंतरचा ही सर्वात कमी नोंद आहे.
- त्या आठवड्यात, ७३६ नवीन प्रकरणे आढळून आली आणि पुढील आठवड्यात ही संख्या ३,१५४ वर पोहोचली.
- गेल्या आठवड्यात डिसेंबर, १२-१८ या गेल्या सात दिवसांत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये १९% ची घट झाली आहे.
पाच महिने भारताची घसरण सुरूच…
- गेल्या पाच महिन्यांपासून देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट होत आहे.
- साप्ताहिक आधारावर, १८-२४ जुलैपासून घसरण सुरू झाली.
- देशात १.३६ लाख नवीन प्रकरणांची नोंद झाली.
- तेव्हापासून सर्व आठवड्यात प्रकरणांमध्ये घट झाली आहे.
- गेल्या आठवड्यात १२ मृत्यूची नोंद झाली आहे जी मार्च २०२० नंतरची सर्वात कमी नोंद होते.
युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोनाची झपाट्याने वाढ!
- आशिया, युरोपसह अनेक देशांमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे.
- २ नोव्हेंबर रोजी जागतिक प्रकरणांची संख्या ३.३ लाख होती.
- तेव्हापासून त्यात सातत्याने वाढ होत आहे.
- १८ डिसेंबर रोजी हा आकडा ५५ टक्क्यांनी वाढून ५.१ लाखांवर पोहोचला.
जपानमध्येही कोरोनाचा कहर…
- जपानमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
- गेल्या सात दिवसांत येथे दहा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
- मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही २३% जास्त आहे.
- या आठवड्यात देशात १,६०० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.
- ही संख्या सुमारे १९ टक्क्यांनी वाढली आहे.
- दक्षिण कोरियामध्ये गेल्या आठवड्यात ४५०,००० हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेलीत.
- ही संख्या मागील आठवड्यापेक्षा ९% जास्त आहे.
- ब्राझील, जर्मनीमध्येही रूग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.
- हाँगकाँग आणि तैवानसारख्या देशांमध्ये एक लाख नवीन रुग्ण आढळले आहेत.