Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सतत झोप येते? आरोग्य संबंधित समस्या आणि त्यावरील उपाय!

September 5, 2026
in आरोग्य
0
sleep

मुक्तपीठ टीम

जर तुम्हाला सतत झोप येत असेल तर यामागे आरोग्य समस्याही असू शकतात. अशा प्रकारच्या आदाराल हायपरसोमनिया असे म्हणतात. या झोपेच्या विकारामुळे माणसाला नेहमी थकवा जाणवतो. झोपेचे विकार अनेक प्रकारचे असतात. काही लोक या समस्येने त्रस्त असतात की त्यांना झोप येत नाही ज्याला निद्रानाश म्हणतात आणि काहीजण बहुतेक वेळा झोपत राहिल्यामुळे अस्वस्थ असतात.

हायपरसोमनिया म्हणजे काय?

  • हायपरसोमनिया हा एक झोपेचा विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला प्रत्येक क्षणी झोप येते.
  • या परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीने रात्री ७ ते ८ तासांची झोप पूर्ण केली, तरीही ती व्यक्ती दिवसा जास्त झोपेमुळे अस्वस्थ राहते.
  • या विकारामुळे त्रस्त व्यक्ती नेहमी झोपेची चिंता करत असतात.
  • हायपरसोमनियामध्ये, जर एखादी व्यक्ती बराच वेळ झोपल्यानंतरही उठली तर त्यांना पुन्हा झोप येते आणि झोप नीट पूर्ण झाली नाही असे वाटते.
  • जास्त झोपेमुळे आणि आळशीपणामुळे त्यांना दैनंदिन जीवनात त्यांची मूलभूत कामे करतानाही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.

हायपरसोमनियाचे २ प्रकार कोणते?

हायपरसोमनियाचे २ प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे, प्रायमरी हायपरसोमनिया आणि दुसरा, सेकेंडरी हायपरसोमनिया असे आहेत.

१. प्रायमरी हायपरसोमनिया

प्रायमरी हायपरसोमनिया ही एक समस्या आहे. यामध्ये एखादा व्यक्ती मेंदूची यंत्रणा झोपेतून जागे होण्याची प्रक्रिया योग्यरित्या नियंत्रित करू शकत नाही.

२. सेकेंडरी हायपरसोमनिया

जर एखाद्या व्यक्तीला प्रत्येक क्षणी झोपेची समस्या येत असेल आणि नेहमी थकवा जाणवत असेल त्याला सेकेंडरी हायपरसोमनिया आहे.

हायपरसोमनिया कशामुळे होतो?

झोपेची कमतरता, नेक्रोप्लास्टी, अल्कोहोल आणि ड्रग्सचे सेवन, कॅफीन, स्लीप एपनिया, लठ्ठपणा, न्यूरोलॉजिकल समस्या, हायपो-थायरॉईडीझम आणि किडनीचे आजार यामुळे हायपरसोमनियाची समस्या असू शकते.

हायपरसोमनियाची लक्षणे

  • सतत थकवा जाणवतो.
  • दिवसा झोप येणे.
  • विचार आणि निर्णय घेण्यात अडचण.
  • ऊर्जेची कमतरता जाणवते.
  • चिडचिड
  • भूक न लागणे
  • एकाग्रतेत अडचण.
  • चिंताग्रस्त वाटणे
  • जास्त झोप असूनही सकाळी उठण्यास त्रास होतो.
  • हायपरसोमनियाचे उपचार
  • जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे.
  • झोपेची काळजी घ्यावी, झोपण्यापूर्वी सिगारेट, अल्कोहोल आणि कॅफिनयुक्त पेये टाळा.
  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.
  • पौष्टिकतेची कमतरता टाळण्यासाठी पौष्टिक आहार घ्या.
  • दररोज ठराविक वेळेत झोपण्याची सवय लावा.
  • बेडरूममध्ये टीव्ही पाहू नका.

Tags: healthhypersomniamuktpeethsleep disorderआरोग्यझोपेचा विकारमुक्तपीठहायपरसोमनिया
Previous Post

कोण आहेत आधुनिक गेमिंगचे जनक जेराल्ड जेरी लॉसन? गुगलने डूडल बनवून आठवणींना केले ताजे…

Next Post

नैसर्गिक गॅसच्या किंमती कच्च्या तेलाच्या किंमतींशी जोडणार! काय घडणार?

Next Post
Parikh Committe

नैसर्गिक गॅसच्या किंमती कच्च्या तेलाच्या किंमतींशी जोडणार! काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!