Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सर्व जिल्ह्यात काँग्रेसची कोरोना सहाय्यता मदत केंद्रे”- नाना पटोले

April 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

 

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि गलथानपणामुळे देशभरात कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर झाले आहे. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर न मिळाल्याने लोकांचे मृत्यू होत आहेत. कोरोना संकटाचा सामना करण्यात केंद्र सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारने सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी झटकली आहे. पण राज्य सरकारने सर्वांना मोफत लस दिली पाहिजे. तसेच या संकटकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सर्व कार्याध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षांची ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली. या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी वामशी चंद रेड्डी, संपतकुमार, बी.एम. संदीप, आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, डॉ. संजय लाखे पाटील आदी उपस्थित होते.

 

यावेळी एच. के. पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या हेल्पलाईन आणि कोरोना मदत व सहाय्य केंद्राकडून सुरु असलेल्या मदत कार्याची व काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सुरु असलेल्या रक्तदान शिबिरांची माहिती घेतली. या अभियाना अंतर्गत लातूर जिल्ह्यात २ हजार ५०० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले याबद्दल एच. के पाटील यांनी पालकमंत्री अमित देशमुख आणि लातूरच्या काँग्रेस पदाधिकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी बोलताना एच. के. पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे देशात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. देशात दररोज हजारो लोक कोरोनामुळे मृत्यू पावत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांसाठी लोकांच्या जीवापेक्षा निवडणुका महत्वाच्या आहेत त्यामुळे ते प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना लोकांच्या जीविताचे काही देणेघेणे नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी केलेल्या आवाहना प्रमाणे या संकटकाळात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेला शक्य ती सर्व मदत करावी.

 

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशात सर्वात जास्त कोरोना रूग्णांची संख्या असतानाही त्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत मिळत नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस पक्ष सातत्याने लोकांची मदत करत आहे. राज्यभरातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात कोरोना सहाय्यता मदत केंद्र आणि हेल्पलाईन सुरु केली असून तिथून हजारो लोकांना दररोज विविध प्रकारची मदत केली जात आहे. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय ही मोठ्या प्रमाणात लोकांना मदत करत आहेत. राज्य सरकार कठिण परिस्थितीत राज्य सरकार लोकांची काळजी घेत आहे. काँग्रेस पक्षही आपल्या परीने लोकांना मदत करत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

यावेळी बोलताना विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्राच्या मदतीशिवाय राज्य सरकार कोरोनाविरोधातील लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय साहित्य पुरवठ्यावर केंद्राचे नियंत्रण आहे. केंद्र सरकार मदतीबाबत महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याने अडचणी आहेत पण राज्य सरकार अडथळ्यांवर मात करून आरोग्यसेवा पुरवत आहे.

 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसतर्फे सुरु असलेल्या मदत कार्याची माहिती दिली तर प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे आणि कुणाल पाटील यांनी राज्यभरात लोकांना मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.


Tags: amit deshmukhbhai jagtapCongresshelpline numbernana patolNarendra modirahul gandhiSonia Gandhiएच. के. पाटीलकेंद्र सरकारबाळासाहेब थोरातलातूर
Previous Post

पुण्यात भाजपा दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार

Next Post

अनुपम खेरांचा खुपणारा माज! सत्तेत कुणीही येवो, पण चिता पेटलेल्या असताना जयघोष कसला?

Next Post
anupam kher shekhar gupta

अनुपम खेरांचा खुपणारा माज! सत्तेत कुणीही येवो, पण चिता पेटलेल्या असताना जयघोष कसला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!