Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यात भाजपा दोन हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा संकल्प

April 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

 

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे शहरात दोन हजार ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करणार असल्याचा संकल्प प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. पुणे शहरात संजीवनी हॉस्पिटल येथे चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने ४० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचे लोकार्पण रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ.‌प्रवीण दबडघाव यांच्या हस्ते झाले. यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

या लोकार्पण सोहळ्यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष आणि पीपीसीआरचे समन्वयक उद्योजक सुधीर मेहता, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणेचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉ. बहार कुलकर्णी, डॉ. मिलिंद बेलसरे, डॉ. मुकुंद पेनुरकर, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणेचे संस्थेचे सहसचिव सुरेंद्र चौगुले, प्रिन्सिपल डॉ. मनिषा सोळंकी आणि बुलडाणा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे उपस्थित होते.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ‘अर्ली डिटेक्शन अर्ली ट्रिटमेंट’वर भर दिला आहे. याअंतर्गत पुणे शहरात दहा हजार बॉटल्स रक्त संकलन आणि दोन हजार ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे शहरातील विविध भागात रक्तदान शिबीराच्या माध्यमातून १२०० बॉटल्स रक्त संकलन झाले आहे. त्याबरोबरच महापालिकेतील नगरसेवकांनी आपापल्या भागात आतापर्यंत ९५ ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था केली आहे. तसेच गरवारे कॉलेजमध्ये ५० बेड्स आणि विश्रांतवाडी येथे २०० ची व्यवस्था करण्यात येत आहे.

 

ते पुढे म्हणाले की, ऑक्सिजन बेड्ससाठी लागणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आणि ऑक्सिजन प्लान्टची आवश्यकता होती. ती आवश्यकता उद्योजक सुधीर मेहता यांच्या मदतीने पूर्ण होणार असून, आगामी काळात पुण्याला १२ ऑक्सिजन प्लांट मिळणार आहेत. महापालिकेतील नगरसेवकांचा निधी वापरून हवेतील ऑक्सिजनचे संकलन करणारे युनिट खरेदी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार नगरसेवकांकडून प्रत्येकी पाच लाख निधी संकलन करुन दोन युनिट पुण्यासाठी खरेदी केले आहेत. महापौरांच्या निधीतून अजून चार युनिटची नोंदणी केली आहे.

 


Tags: chandrakant patilcorona centerpuneचंद्रकांत पाटीलपुणे
Previous Post

केंद्राच्या सरकारी विभागांची सर्व रुग्णालयं नागरिकांसाठी खुली करा! वर्षा देशपांडेंची मागणी!!

Next Post

“सर्व जिल्ह्यात काँग्रेसची कोरोना सहाय्यता मदत केंद्रे”- नाना पटोले

Next Post
nana patole

"सर्व जिल्ह्यात काँग्रेसची कोरोना सहाय्यता मदत केंद्रे"- नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!