मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे ‘सेलिब्रिटी’ बुद्धिमंत नेते म्हणून ओळखले जाणारे खासदार शशी थरूर यांना काँग्रेसने इशारा दिला आहे. त्यांच्या गृहराज्यातील एका प्रकल्पाबद्दलचा काँग्रेसचा निर्णय ते पाळत नसल्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी त्यांना हकलापट्टीचा इशारा दिला आहे.
केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष के सुधाकरन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासह पक्षातील इतर कोणालाही त्यांचे निर्देश नाकारण्याचा अधिकार नाही. त्याच वेळी, सुधाकरन यांनी थरूर यांना इशारा दिला की त्यांना काँग्रेसने घेतलेल्या निर्णयांच्या मर्यादेत रहावे लागेल, नाहीतर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल.
शशी थरुरांची गाडी पक्षाच्या रुळावरून घसरतेय…
- कन्नूरमध्ये माध्यमांशी बोलताना सुधाकरनांनी थरुरांना चांगलंच सुनावलं.
- शशी थरूर पक्षातील फक्त एक व्यक्ती आहेत.
- शशी थरूर म्हणजे काँग्रेस नाही.
- पक्षाच्या निर्णयांच्या मर्यादेत राहिल्यास ते पक्षाचा भाग असतील.
- नाहीतर त्यांची हकालपट्टी केली जाईल.
- पक्षाच्या खासदारांनी केरळमधील ‘सेमी-हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर’ विरोधात केंद्राला दिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करण्यास थरुर यांनी नकार दिला आहे.
- त्यांनी अलीकडेच डाव्या आघाडीचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची उघडपणे प्रशंसा केली.
- त्यामुळे राज्यातील नेते थरुरांवर चिडले आहेत.
- आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या टीकेला उत्तर देताना थरूर यांनी ट्विट केले होते की काही मुद्द्यांवर राजकीय मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक आहे.
सिल्व्हर लाईन प्रकल्पाचा अभ्यास करून आपले मत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुधाकरन म्हणाले की प्रत्येकाला स्वतःचे मत बनवण्याचा अधिकार आहे, “पण ते शशी थरूर असोत किंवा के सुधाकरन, पक्षाचे निर्णय नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही.” पक्षातील कोणालाही असा अधिकार दिलेला नाही, खासदारालाही नाही, असेही ते म्हणाले. सुधाकरन म्हणाले की, थरूर यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले असून ते प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला