Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली…आता कोरोनाचं कारण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul and soniya gandhi

मुक्तपीठ टीम

कॉंग्रेस पक्षाने काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. कोरोना संकटाचं कारण देत पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कार्य समितीत २३ जून रोजी निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निवडणुकीची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल.

 

काँग्रेस कार्य समितीची बैठक आज पार पडली. निवडणूक पुढे ढकलण्याचा हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष केले गेले. पण २ वर्षानंतरही पक्षाध्यक्षपदी निवड झालेली नाही. जूनमध्ये पुन्हा एकदा राहुल गांधींच्या हातात कॉंग्रेसची सूत्र दिली जाऊ शकतात, अशी चर्चा होती.

 

पक्षाचे अनेक नेते संघटनेची निवडणूक लवकरच घेण्यात यावी अशी मागणी करत असतानाच कॉंग्रेस पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केली आहे. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या २३ प्रमुख नेत्यांनी लवकर निवडणुकीची मागणी केली होती. संघटनेच्या निवडणुकांमुळे आणि पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे पक्षाला त्रास होत असल्याचे या नेत्यांनी बर्‍याच वेळा सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचं कारण जरी योग्य असलं तरीही या असंतुष्ट नेत्यांमुळेही निवडणूक टाळण्याचा निर्णय झाला असावा, अशीही चर्चा आहे.

 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षालाही पराभव स्वीकारावा लागला.. तामिळनाडूशिवाय इतरत्रही पक्षाला अत्यंत निराशाजनक निकाल मिळाले. पश्चिम बंगालमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. आसाम आणि केरळमध्ये चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी केरळमध्ये सत्ताबदलाची परंपरा मात्र खंडित झाली आहे.


Tags: Congressrahul gandhisoniya gandhiकार्य समितीकॉंग्रेसनिवडणुकराहुल गांधीसोनिया गांधी
Previous Post

महाआयटी अंतर्गत चार जागांसाठी भरती

Next Post

कोरोनातून मुक्त…पण बुरशी संसर्गाचा धोका! कसा ओळखायचा आणि टाळायचा?

Next Post
mucormycosis

कोरोनातून मुक्त...पण बुरशी संसर्गाचा धोका! कसा ओळखायचा आणि टाळायचा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!