मुक्तपीठ टीम
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर अखेर काँग्रेसचे दलित नेते चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री निवडीसाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये तळालाही नसलेले चन्नींचे नाव निवडले तरी कसे गेले, अशी चर्चा आता रंगली आहे. त्यात कॅप्टनची साथ सोडून गेलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची निरीक्षणे आणि टीम राहुल गांधींचा अभ्यास असल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत किशोरांनी पंजाबातील बदलत्या राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधले होते. पंजाबात तब्बल ३२ टक्के असणाऱ्या दलित मतांचा मुद्दाही टीम राहुलच्या चर्चेत होता. त्यात आप आणि अकाली दल-बसपाने या वर्गातूनच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री देण्याची घोषणा केल्याने काँग्रेस आधीच दलित मुख्यमंत्री निवडून त्या दोन्ही पक्षांवर डाव उलटवला आहे.
पंजाबमध्ये काँग्रेसने इतिहास घडवला!
- पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दलित मुख्यमंत्री
- काँग्रेसच्या या राजकीय खेळीने विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे.
- चन्नी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री असतील.
- पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच दलित नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहेत.
- आतापर्यंत फक्त जाट शीख समाजातूनच मुख्यमंत्री बनले आहेत.
काँग्रेसने का निवडला दलित समाजातून मुख्यमंत्री?
- पंजाबमध्ये ३२% दलित मतदार आहेत.
- यामध्ये शीख आणि हिंदू समाजातील दलितांचा समावेश आहे.
- पंजाबमध्ये जाट सिख समाज फक्त १९% आहे, परंतु आतापर्यंत पंजाबी राजकारणावर त्यांचंच वर्चस्व राहिलं आहे.
- यामुळेच आता राजकीय पक्षांनी आता दलित कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे.
- दलितांना उच्च पदे देत जातीय ध्रुविकरणाचा प्रयत्न करण्यात आला.
- काँग्रेसने थेट दलितांना मुख्यमंत्री बनवून दलितांना थेट मोठा संदेश दिला आहे.
काँग्रेसच नाही इतर पक्षांचेही दलित मतांवर लक्ष!
- अकाली दलाने विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीसोबत युती केली आहे. जिंकल्यास दलित उपमुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले.
- अकाली दलापासून विभक्त झाल्यानंतर भाजपने आम्ही निवडणुका जिंकलो तर आम्ही दलित आमदाराला मुख्यमंत्रीपद देऊ असे म्हटले आहे.
- आम आदमी पक्षाने अनेकदा असे म्हटले आहे की, त्यांनी दलितांच्या सन्मानासाठी पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून हरपाल चीमा यांची नियुक्ती केली आहे.
- दलितांना आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने चन्नी यांची अनपेक्षित निवडून विरोधी पक्षांसमोर पेच निर्माण केला आहे.
- बसपाच्या अध्यक्षा मायावतींच्या नकारात्मक प्रतिक्रियेतून विरोधकांची अस्वस्थताच व्यक्त झाल्याचे मानले जाते.