Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महागाईविरोधात काँग्रेसचं डिजिटल आंदोलन! मिस कॉल द्या, समर्थन करा!!

November 13, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
काँग्रेस

मुक्तपीठ टीम

महागाईच्या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात जनजागरण अभियानांतर्गत काँग्रेस डिजिटल पद्धतीने लोकांना स्वतःशी जोडणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पक्षाने एक क्रमांक जारी केला आहे. त्यावर ‘मिस कॉल’ देऊन महागाईविरुद्धच्या पक्षाच्या मोहिमेला कोणीही पाठिंबा देऊ शकतो. पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले की, कोणीही व्यक्ती १८००२१२००००११ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन या मोहिमेत सहभागी होऊ शकते.

 

काँग्रेसची डिजिटल मोहीम

  • काँग्रेसच्या महागाईविरोधी डिजिटल मोहिमेत कोणालाही सहभागी होता येणार आहे.
  • यासाठी १८००२१२००००११ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
  • मिस्ड कॉल दिल्यावर लोकांना एसएमएस मिळेल. त्याच्यासोबत एक डिजिटल फॉर्म येईल.
  • फॉर्म भरून लोक ‘जनजागरण अभियाना’ला आपला पाठिंबा नोंदवू शकतात.

 

‘जनजागरण अभियाना’अंतर्गत काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते देशातील विविध भागात पदयात्रा काढणार आहेत. जनसंवाद आणि इतर कार्यक्रमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असेल. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरीक, विशेषतः महिलांना महागाईविरोधातील आंदोलनाशी जोडले जावे, असा पक्षाचा प्रयत्न आहे.

 

रोहन गुप्ता म्हणाले की, जाहीर केलेल्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन फॉर्म भरून नागरीक महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या प्रचाराला पाठिंबा देऊ शकतात. काँग्रेसच्या ‘जनजागरण अभियाना’अंतर्गत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विविध भागात पदयात्रा काढतील आणि जनसंवाद आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शाश्वत चळवळीवरील समितीने महागाईच्या मुद्द्यावर ‘जनजागरण अभियाना’शी संबंधित कार्यक्रम ठरवले आहेत, ज्याला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणीने मान्यता दिली आहे. ही मोहीम १४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मोदी सरकारविरोधातील काँग्रेसच्या या मोहिमेला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.


Tags: CongressCongress digital campaignmodi govermentmuktpeethकाँग्रेसकाँग्रेस मिस कॉल आंदोलनजनजागरण अभियानडिजिटल आंदोलनमहागाईविरोधमुक्तपीठमोदी सरकार
Previous Post

“तुम्ही किती लोकांना बदनाम करणार, किती लोकांना आत टाकणार, मुद्दाम बदनाम करुन आत टाकलंत तरी बाकीचे आमदार आहेतच”! – जयंत पाटील

Next Post

लाखो रुपये खर्चून फेक व्ह्यूजचे रॅकेट! रॅपर बादशहाविरोधात आरोपपत्र, इतरांचं काय?

Next Post
Badshah

लाखो रुपये खर्चून फेक व्ह्यूजचे रॅकेट! रॅपर बादशहाविरोधात आरोपपत्र, इतरांचं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!