मुक्तपीठ टीम
देशात सध्या हिजाब प्रकरण चांगलचं गाजत आहे. हिजाब प्रकरणाचे पडदसाद सगळीकडे उमटताना दिसत आहेत. दरम्यान कर्नाटकातील हुबळी येथील काँग्रेस नेते काँग्रेस नेते जमीर अहमद यांचे हिजाब संबंधित वादग्रस्त विधान समोर आलं आहे. अहमद म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब म्हणजे पडदा… महिलांचे सौंदर्य लपविण्यासाठी त्यांना हिजाब घातले जाते… हे आजपासून नाही, वर्षानुवर्षे सुरू आहे. हिजाब परिधान न केल्यास महिलांवर बलात्कार होतो, असेही ते म्हणाले.
खरं तर, एका विधानाचा हवाला देऊन, एका पत्रकाराने त्यांना विचारले की कुराणमध्ये कुठेही असे म्हटलेले नाही की ड्रेस कोडमध्ये हिजाब असणे आवश्यक आहे. यावर काँग्रेस नेते जमीर अहमद म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब याचा अर्थ पडदा, असा आहे. मुली आणि महिलांना हिजाबमध्ये ठेवले जाते जेणेकरून त्यांचे सौंदर्य दिसू नये. महिला आणि मुलींचे सौंदर्य लपवण्यासाठी त्यांना हिजाब घातले जाते.
जमीर अहमद पुढे म्हणाले की, महिलांवर बलात्कार होण्याचे कारण म्हणजे त्यांना पडद्याआड न ठेवणे. हिजाब घालण्याची पद्धत आजपासून नाही आणि ती गरजेचीही नाही. ज्याला घालायचे आहे, सुरक्षित राहायचे आहे. ज्या महिलेला स्वत:चे सौंदर्य इतरांना दाखवायचे नाही, त्या हिजाब घालतात. हिजाब घालणे सक्तीचे नाही, तो वर्षानुवर्षे घातला जात आहे, असं जमीर अहमद यांनी म्हटलंय.