Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदी युगानंतर भाजपा विस्कटणार, काँग्रेसचे खरंच अच्छे दिन येणार? काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी!

March 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Congress veerappa

मुक्तपीठ टीम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या निकालांनंतर भाजपा जोमात तर काँग्रेस कोमात गेल्याचं सांगितलं जातं. सततच्या पराभवांमुळे काँग्रेससमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं मानलं जात आहे. जी-२३ गटातील काँग्रेसच्या नेत्यांनी थेट पक्षनेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले आहे. या असंतुष्ट नेत्यांशी सध्या काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून चर्चा केली जात आहे. त्याचवेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी मोठे विधान केले आहे. काँग्रेस हा सदाबहार पक्ष असून त्याची मुळे लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहेत, मात्र देशात पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसने आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे ते म्हणाले. त्याचवेळी मोदी युगानंतर भाजपा विस्कळीत होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

मोदींनंतर भाजपा विस्कळीत होईल!

  • नेतृत्वावरून मोदींनंतरच्या काळात भाजपला आंतरिक कलह सहन करता येणार नाही, असेही मोईली म्हणाले.
  • मोदींच्या जाण्याने भाजपा विस्कळीत होणार आहे. भाजपा हा सदाबहार पक्ष नाही.
  • असंतुष्ट जी-२३ नेत्यांनी बैठकीदरम्यान निर्णय घेतला की, पक्षासाठी पुढे जाण्याचा एकमेव मार्ग सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आहे.
  • पक्षाला सर्व पातळ्यांवर निर्णय क्षमतेचे मॉडेल पाळावे लागेल.

 

काँग्रेस आहे भविष्यातही असेल…

  • मोईली यांनी सांगितले की, निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने जीवन, समाज या प्रत्येक विषयाकडे स्वतःचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
  • जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, काँग्रेस पक्षाने गरीब आणि दलितांसाठी काम करणे थांबवले तर ते संपेल.
  • आपण आशा ठेवली पाहिजे.
  • काँग्रेस नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी घाबरू नये.
  • दलित समाजाच्या हक्कांसाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे.
  • भाजपा आणि इतर पक्ष येतील आणि जातील.
  • काँग्रेस भविष्यातही असेल.
  • सोनिया गांधींना काँग्रेस पक्षात सुधारणा हव्या आहेत पण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी हे होऊ दिलेले नाही.
  • ते म्हणाले की, जी-२३ नेते सोनिया गांधींना लक्ष्य करून पक्ष कमकुवत करत आहेत.
  • दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

Tags: BJPCongressVeerappa Moilyकाँग्रेसजी-२३भाजपावीरप्पा मोईली
Previous Post

एमआयएमची काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला ऑफर! खरंच भाजपाविरोधात नेम की बी टीमसारखा भाजपासाठीच गेम?

Next Post

सुमारे २०० कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा! महाराष्ट्र जीएसटीकडून दोन व्यापाऱ्यांना अटक!

Next Post
Mantralay

सुमारे २०० कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा! महाराष्ट्र जीएसटीकडून दोन व्यापाऱ्यांना अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!