Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टूल किटचा वाद ट्विटरच्या मुख्यालयात: नड्डा, पात्रा, इराणींसह भाजप नेत्यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Congress-BJP

मुक्तपीठ टीम

देशात कोरोनाचं संकट घोंगावत असतान राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र सुरूच आहेत. भाजपाने केलेल्या टूलकिट आरोपांनंतर आता राजकारण चांगलचं तापलं आहे. हा वाद आता ट्विटरच्या मुख्यालयापर्यंत पोहोचला आहे. कॉंग्रेसने ट्विटरच्या मुख्यालयाला मेल केला आहे. ज्यात त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा, मंत्री स्मृती इराणी, सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्यावर बनावट कागदपत्रांचा कट रचत दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी ट्विटरचा गैरवापर झाल्यानं त्यांचे अकाऊंट त्वरित बंद करावे अशी मागणी केली आहे.

काँग्रेसचा भाजपावर ट्विटर मेल हल्ला

  • भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस रिसर्च सेलच्या नावाने कट रचला आणि बनवाट कागदपत्र तयार केली.
  • ज्यामध्ये चुकीची, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी माहिती दिली गेली.
  • या बनावट कागदपत्रांचा गैरवापर सर्व डिजिटल व प्रसारण माध्यमावर करण्यात आला.
  • ज्यात ट्विटरचा देखील समावेश आहे.
  • भाजपा नेत्यांनी समाज घटकांमध्ये वैमनस्य पसरवले आहे.
  • यामुळे भारताच्या विविध भागात हिंसाचार पसरला आणि जातीय सलोखा वाढला.
  • कॉंग्रेसने मेलमध्ये भाजप नेत्यांच्या ट्विटर अकाउंटचा तपशीलही जोडला आहे.

 

भाजपाचा काँग्रेसवरील टूल किट हल्ला

  • काँग्रेसनं कोरोना संकट काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा आरोप भाजपानं केला आहे.
  • तसेच देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.

 

काँग्रेस भाजप नेत्यांविरोधात कारवाईसाठी आक्रमक

कॉंग्रेसने ट्विटरला सांगितले की, वर उल्लेख केलेल्या भाजप नेत्यांविरोधात चौकशी करण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांना १८ मे रोजी एफआयआर दाखल करण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

मोदी सरकारला सत्य लपवायचे आहे

  • कॉंग्रेसने मेलमध्ये लिहिले की, टूल किटचा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील मोदी सरकारला आपले अपयश लपवायचे आहेत.
  • भारतीय जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकार अपयशी ठरलं आहे.
  • भाजप सरकार कॉंग्रेसवर असे खोटे आरोप करून सत्य लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे.
  • ट्विटरच्या माध्यमातून गैरवापर करीत आहे.
  • टूल्स किटबाबत भाजप नेत्यांनी जारी केलेले ट्विट हटवून कॉंग्रेसने ट्विटरकडे या नेत्यांचे अकाउंट कायमचे बंद करण्याची मागणी केली.

Tags: BJPCongressprime minister narendra modirahul gandhiपंतप्रधान नरेंद्र मोदीराहुल गांधी
Previous Post

“मुंबई अडीच लाख कोटी देते, याचं भान राखून दिल्लीश्वर कोकणाला दोनेक हजार कोटी देतीलच”!

Next Post

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दौरा दोनच जिल्ह्यांचा का?”

Next Post
fadanvis-Thackeray

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दौरा दोनच जिल्ह्यांचा का?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!