मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाचं संकट घोंगावत असतान राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र सुरूच आहेत. भाजपाने केलेल्या टूलकिट आरोपांनंतर आता राजकारण चांगलचं तापलं आहे. हा वाद आता ट्विटरच्या मुख्यालयापर्यंत पोहोचला आहे. कॉंग्रेसने ट्विटरच्या मुख्यालयाला मेल केला आहे. ज्यात त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा, मंत्री स्मृती इराणी, सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्यावर बनावट कागदपत्रांचा कट रचत दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी ट्विटरचा गैरवापर झाल्यानं त्यांचे अकाऊंट त्वरित बंद करावे अशी मागणी केली आहे.
काँग्रेसचा भाजपावर ट्विटर मेल हल्ला
- भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस रिसर्च सेलच्या नावाने कट रचला आणि बनवाट कागदपत्र तयार केली.
- ज्यामध्ये चुकीची, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी माहिती दिली गेली.
- या बनावट कागदपत्रांचा गैरवापर सर्व डिजिटल व प्रसारण माध्यमावर करण्यात आला.
- ज्यात ट्विटरचा देखील समावेश आहे.
- भाजपा नेत्यांनी समाज घटकांमध्ये वैमनस्य पसरवले आहे.
- यामुळे भारताच्या विविध भागात हिंसाचार पसरला आणि जातीय सलोखा वाढला.
- कॉंग्रेसने मेलमध्ये भाजप नेत्यांच्या ट्विटर अकाउंटचा तपशीलही जोडला आहे.
भाजपाचा काँग्रेसवरील टूल किट हल्ला
- काँग्रेसनं कोरोना संकट काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा आरोप भाजपानं केला आहे.
- तसेच देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.
काँग्रेस भाजप नेत्यांविरोधात कारवाईसाठी आक्रमक
कॉंग्रेसने ट्विटरला सांगितले की, वर उल्लेख केलेल्या भाजप नेत्यांविरोधात चौकशी करण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांना १८ मे रोजी एफआयआर दाखल करण्याची विनंती करण्यात आली आहे.
मोदी सरकारला सत्य लपवायचे आहे
- कॉंग्रेसने मेलमध्ये लिहिले की, टूल किटचा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील मोदी सरकारला आपले अपयश लपवायचे आहेत.
- भारतीय जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकार अपयशी ठरलं आहे.
- भाजप सरकार कॉंग्रेसवर असे खोटे आरोप करून सत्य लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे.
- ट्विटरच्या माध्यमातून गैरवापर करीत आहे.
- टूल्स किटबाबत भाजप नेत्यांनी जारी केलेले ट्विट हटवून कॉंग्रेसने ट्विटरकडे या नेत्यांचे अकाउंट कायमचे बंद करण्याची मागणी केली.