Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“व्हॉट्सअॅप चॅट्समुळे आर्यन खान तुरुंगात, मग अर्णब गोस्वामींच्या टीआरपी चॅटचे काय झाले?”

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचा प्रश्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
aryan khan-arnab goswami

मुक्तपीठ टीम

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने अटक केली. यावेळी त्याच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून अनेक गोष्टींचा हवाला देत त्याच्या जामिनास सुद्धा विरोध केला जात आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे एनसीबीवरील आरोपसत्र सुरुच असताना आता काँग्रेसनेही भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांवर हल्ला चढवला आहे. काँग्रेसनं रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी यांच्या ‘व्हॉट्सअॅप चॅट’बद्दल तपास यंत्रणांना सवाल केला आहे. जर आर्यनला चॅट पुराव्यामुळे एवढे दिवस गजाआड काढावे लागतात, तर मग टीआरपी घोटाळा मांडणाऱ्या गोस्वामींच्या चॅट्सचे काय झाले, हे देशाला कळेल का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

 

आर्यन खानचं एनसीबीच्या युक्तिवादाला उच्च न्यायालयात आव्हान

  • ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ही संस्था भाजप सरकारच्या सांगण्यावरून बॉलिवूडमधील कलाकारांना त्रास देत आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
  • भाजपसाठी ही एजेंसी वसुलीचा धंदा करत आहे’, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
  • मलिक यांच्या आरोपांनंतर आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
  • आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देऊन एनसीबीनं त्याला कोठडीत अडकवलं आहे.
  • त्याला जामीन मिळू देण्यास विरोध केला जात आहे.
  • आर्यन खाननं एनसीबीच्या युक्तिवादाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
  • ‘माझ्या व्हॉट्सअॅप संदेशांचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.
  • त्यातून कुठलीही गुप्त माहिती पुढं आलेली नाही, असा दावा आर्यन खाननं उच्च न्यायालयात केला आहे.

 

‘अर्णब गोस्वामींच्या त्या चॅटचे काय झाले?

  • हे सगळं सुरू असतानाच अतुल लोंढे यांनी टीआरपी घोटाळा प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटचा मुद्दा चव्हाट्यावर आणला आहे.
  • टीआरपी घोटाळ्यात बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती.
  • त्यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी पुढं आल्या होत्या.
  • रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबत दासगुप्ता यांच्याशी झालेले व्हॉट्सअॅप संभाषणही व्हायरल झाले होते.
  • त्यानंतर देशभर खळबळ उडाली होती.
  • या चॅटमध्ये टीआरपी कृत्रिमरित्या बदलविषयी चर्चा होती.
  • पंतप्रधान कार्यालयाचाही त्यात उल्लेख होता.
  • मात्र, पुढं यातून काहीच निष्पन्न झालं नाही.
  • अर्णब गोस्वामी यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.
  • हाच मुद्दा अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
  • ‘अर्णब गोस्वामींच्या त्या चॅटचे काय झाले? हे देशाला कळेल का?,’ असा सवाल अतुल लोंढे यांनी केला आहे.

Tags: Aryan KhanBJPNawab MalikNCBNCPएनसीबीटीआरपी घोटाळानवाब मलिक
Previous Post

भारतीयांचा डॉक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षक, गाववाल्यांवर विश्वास! पुढारी, मंत्री, पत्रकारांवर अविश्वास!

Next Post

भाजपाकडून परिवहन मंत्री अनिल परब पुन्हा लक्ष्य! परब गुंतले तरी कुठे? मविआने एसटीला वाऱ्यावर सोडले…

Next Post
bjp-anil parab

भाजपाकडून परिवहन मंत्री अनिल परब पुन्हा लक्ष्य! परब गुंतले तरी कुठे? मविआने एसटीला वाऱ्यावर सोडले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!