मुक्तपीठ टीम
गेले काही महिने ट्विटरवरील युद्धात भाजपाला वरचढ ठरत असलेल्या काँग्रेसचा हात आता ट्विटरच्या कारवाईमुळे बांधला जाऊ लागला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या खात्यावर कारवाई केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच ज्येष्ठ नेत्यांची खातीही लॉक करण्यात आली आहेत. काँग्रेस पक्षाशी संबंधित पाच हजारांपेक्षाही जास्त खात्यांवर कारवाई केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यासाठी काँग्रेसने ट्विटरवर भाजपाच्या दबावाखाली कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस विरुद्ध ट्विटर
- दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना राहुल गांधी भेटल्यानंतर ती छायाचित्र ट्वीट केल्यानंतर भाजपाकडून तक्रार करण्यात आली.
- त्यानंतर भारतीय कायदे लक्षात घेत ट्विटरने राहुल गांधींचे खाते लॉक केले.
- आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांचीही ट्विटर खाती लॉक करण्यात आली आहेत.
काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी ट्विटर हे भाजपा सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. ट्विटरने भारतातील नेते आणि कार्यकर्त्यांची ५,००० खाती आधीच बंद केली आहेत. त्यांना हे समजले पाहिजे की ट्विटर किंवा सरकार आम्हाला दाबू शकत नाही.
राहुल गांधींच्या बाबतीत काय घडलं?
- राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा फोटो ट्वीट केला होता.
- त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता.
- त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं.
- त्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आले.
- राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या ट्रम्पनाही नडणारं ट्विटर मोदी सरकारपुढे का नमलं?