Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा! खोली बंद करून अधिकाऱ्यांना खुर्चीने मारहाण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vishweshwar

मुक्तपीठ टीम

केंद्रातील आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांच्यावर त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील मयूरभंजमधील दोन अधिकाऱ्यांनी मारहाणीचा आरोप आहे. विश्वेश्वर तुडू यांनी भाजप जिल्हा कार्यालयात खोली बंद करून खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप ओडिशा सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी अधिकारी हे जखमी झाले. आता केंद्रीय मंत्र्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, तुडू यांनी मारहाणीचा आरोप फेटाळला असून, आपल्याविरुद्ध कट रचून खोटे आरोप केले जात असल्याचे म्हटले आहे.

या दोन अधिकाऱ्यांमधील एकाने तुडू यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. सीआरपीसी कलम १६१ अंतर्गत सरकारी अधिकाऱ्याचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

 

मंत्रीसाहेब का संतापले?

  • मंत्र्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल अधिकाऱ्यांना खडसावले. अधिकाऱ्यांनी सांगितले की निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने आम्ही फाइल घेऊन येऊ शकत नाही. यासाठी कार्यालयातच आढावा घ्यावा.
  • या प्रकारामुळे मंत्री विश्वेश्वर तुडू संतापले.
  • त्यानंतर शुक्रवारी या दोन्ही अधिकाऱ्यांना दिल्ली कार्यालयातून फोन आला की फाईल घेऊन जाऊ नका, तर असचं जाऊन मंत्र्यांना भेटा. त्यांना काहीतरी जाणून घ्यायचे आहे.
  • यानंतर दोन्ही अधिकारी मंत्र्यांची भेट घेण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहोचले.
  • अधिकारी येथे पोहोचताच तुडू त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
  • म्हटले की, तुम्हाला प्रोटोकॉल माहीत नाही का? मंत्री होण्याआधी मी कोण, तुम्हाला माहीत नाही काय- असे म्हणत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली.
  • सहाय्यक संचालक देवाशिष महापात्रा यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयात मंत्र्यांनी खोलीचे दरवाजे बंद करून आम्हाला मारहाण केली आहे.

 

मंत्री महोद्यांनी केली खुर्चीने मारहाण

  • मयूरभंज जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचे सहाय्यक संचालक देबाशीष अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सध्या लागू आहे आणि त्यामुळे आम्ही फाइल आणू शकलो नाही.
  • पण ते रागावले आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला.
  • त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करून खुर्ची उचलून आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

एका अधिकाऱ्याचा डावा हात मोडला

  • या मारहाणीत महापात्रा यांचा उजवा हात मोडला, असे रघुनाथ मुर्मू मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
  • तर या बैठकीत सहभागी असलेल्या नियोजन मंडळाच्या संचालक अश्विनी मलिक याही जखमी झाल्या आहेत.
  • दोन्ही अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
  • त्यानंतर मलिक यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही केली.

 

केंद्रीय मंत्र्यांनी आरोप फेटाळले

  • तुडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
  • ते म्हणाले की, हे खोटे आणि निराधार आरोप आहेत.
  • माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी दोन्ही पक्षांनी असे आरोप केल्याचा दावा तुडू यांनी केला.
  • मात्र, तुडू यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना आढावा बैठकीसाठी बोलावल्याचे मान्य केले आहे.
  • मी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नंतर येण्यास सांगितले, असे ते म्हणाले.

Tags: bishwear tuduBJPओडिशा सरकारदेबाशीष महापात्राभाजपाविश्वेश्वर तुडू
Previous Post

भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियान

Next Post

“सरकारी कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवण्यावर बंदी! बैठकांमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉचवरही बंदी! झूम, गुगल मीटही नको!!”

Next Post
Social Media

"सरकारी कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवण्यावर बंदी! बैठकांमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉचवरही बंदी! झूम, गुगल मीटही नको!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!