Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकारी कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवण्यावर बंदी! बैठकांमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉचवरही बंदी! झूम, गुगल मीटही नको!!”

केंद्राची सरकारी कामकाजाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Social Media

मुक्तपीठ टीम

आता व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतेही सरकारी दस्तावेज शेअर करता येणार नाहीत. गोपनीय माहिती लीक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. यामुळे सरकारने र गोपनीय मुद्द्यांशी संबंधित महत्त्वाच्या बैठकींमध्ये स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉचचा वापरावरही बंदी घातली आहे. यासाठी सरकारने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

 

परदेशी सर्व्हर्समुळे गळतीचा धोका!

  • सध्याची राष्ट्रीय संप्रेषण मार्गदर्शक तत्त्वे आणि गोपनीय माहितीची गळती रोखण्यासाठीच्या सरकारी निर्देशांचे वारंवार उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
  • त्यामुळे ही नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याचे सांगितले जाते.
  • नवीन कम्युनिकेशन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व सरकारी अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप, टेलिग्राम इत्यादींवर गोपनीय माहिती शेअर करू नये, असे सांगण्यात आले आहे.
  • या अॅप्सच्या सर्व्हरवर परदेशातील खासगी कंपन्यांचे नियंत्रण असते, त्यामुळे गोपनीय माहितीचा भारतविरोधी घटकांकडून गैरवापर होऊ शकतो.

 

सरकारी संवाद कसा होणार?

  • सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की, घरातून काम करताना म्हणजेच वर्क फ्रॉम होम (WFH), अधिकाऱ्यांनी संवादासाठी फक्त ई-ऑफिस अॅप्लिकेशन वापरावे.
  • तसेच होम सेटअपद्वारे वर्क फ्रॉम होम दरम्यान गोपनीय माहिती सामायिक करू नका.
  • घरून काम करत असताना, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) च्या व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे होम सिस्टम ऑफिस नेटवर्कशी जोडलेले असावे.

 

मोबाईलवर गोपनीय माहिती स्टोअर करण्यास मनाई!

  • सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाइल फोनवर कोणतीही वर्गीकृत किंवा गोपनीय माहिती संग्रहित करण्यास देखील मनाई करण्यात आली होती.
  • या अ‍ॅप्सचे सर्व्हर खासगी कंपन्यांच्या हातात असल्याने देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याने मोबाइल अॅप्सद्वारे ही माहिती शेअर करण्यासही मनाई आहे.

 

बैठकांमध्ये अत्याधुनिक गॅजेट्सवरही बंदी

गोपनीय किंवा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर मीटिंगमध्ये स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच वापरू नयेत, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
याशिवाय अॅमेझॉनचे अलेक्सा, अॅपलचे होमपॅड आदी उपकरणे वापरण्यासही मनाई आहे.

 

Google Meet आणि Zoom वापरण्यास मनाई

  • व्हर्च्युअल मीटिंगसाठी Google Meet किंवा Zoom सारखे अॅप्स वापरण्यासही मनाई आहे.
  • त्याऐवजी, C-DAC (Department of Advanced Computing), NIC द्वारे स्थापित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपकरणे अनिवार्य पासवर्डसह वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Tags: central govtGoogle Meettelegramwhatsappzoomकेंद्र सरकारझूमटेलिग्रामव्हॉट्सअॅप
Previous Post

केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा! खोली बंद करून अधिकाऱ्यांना खुर्चीने मारहाण!

Next Post

भारतीय प्रजासत्ताक दिन: महाराष्ट्रात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सव्वा नऊ वाजता

Next Post
Republic day falg hoisting ceremony in Maharashtra will start at 9.30 am

भारतीय प्रजासत्ताक दिन: महाराष्ट्रात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सव्वा नऊ वाजता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!