मुक्तपीठ टीम
केंद्रातील आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांच्यावर त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील मयूरभंजमधील दोन अधिकाऱ्यांनी मारहाणीचा आरोप आहे. विश्वेश्वर तुडू यांनी भाजप जिल्हा कार्यालयात खोली बंद करून खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप ओडिशा सरकारच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. यावेळी अधिकारी हे जखमी झाले. आता केंद्रीय मंत्र्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, तुडू यांनी मारहाणीचा आरोप फेटाळला असून, आपल्याविरुद्ध कट रचून खोटे आरोप केले जात असल्याचे म्हटले आहे.
या दोन अधिकाऱ्यांमधील एकाने तुडू यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. सीआरपीसी कलम १६१ अंतर्गत सरकारी अधिकाऱ्याचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
मंत्रीसाहेब का संतापले?
- मंत्र्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल अधिकाऱ्यांना खडसावले. अधिकाऱ्यांनी सांगितले की निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने आम्ही फाइल घेऊन येऊ शकत नाही. यासाठी कार्यालयातच आढावा घ्यावा.
- या प्रकारामुळे मंत्री विश्वेश्वर तुडू संतापले.
- त्यानंतर शुक्रवारी या दोन्ही अधिकाऱ्यांना दिल्ली कार्यालयातून फोन आला की फाईल घेऊन जाऊ नका, तर असचं जाऊन मंत्र्यांना भेटा. त्यांना काहीतरी जाणून घ्यायचे आहे.
- यानंतर दोन्ही अधिकारी मंत्र्यांची भेट घेण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहोचले.
- अधिकारी येथे पोहोचताच तुडू त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
- म्हटले की, तुम्हाला प्रोटोकॉल माहीत नाही का? मंत्री होण्याआधी मी कोण, तुम्हाला माहीत नाही काय- असे म्हणत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली.
- सहाय्यक संचालक देवाशिष महापात्रा यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयात मंत्र्यांनी खोलीचे दरवाजे बंद करून आम्हाला मारहाण केली आहे.
मंत्री महोद्यांनी केली खुर्चीने मारहाण
- मयूरभंज जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचे सहाय्यक संचालक देबाशीष अधिकारी म्हणाले, “आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सध्या लागू आहे आणि त्यामुळे आम्ही फाइल आणू शकलो नाही.
- पण ते रागावले आणि त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला.
- त्यांनी खोलीचा दरवाजा बंद करून खुर्ची उचलून आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
एका अधिकाऱ्याचा डावा हात मोडला
- या मारहाणीत महापात्रा यांचा उजवा हात मोडला, असे रघुनाथ मुर्मू मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- तर या बैठकीत सहभागी असलेल्या नियोजन मंडळाच्या संचालक अश्विनी मलिक याही जखमी झाल्या आहेत.
- दोन्ही अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
- त्यानंतर मलिक यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारही केली.
केंद्रीय मंत्र्यांनी आरोप फेटाळले
- तुडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
- ते म्हणाले की, हे खोटे आणि निराधार आरोप आहेत.
- माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी दोन्ही पक्षांनी असे आरोप केल्याचा दावा तुडू यांनी केला.
- मात्र, तुडू यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना आढावा बैठकीसाठी बोलावल्याचे मान्य केले आहे.
- मी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नंतर येण्यास सांगितले, असे ते म्हणाले.