मुक्तपीठ टीम
अमेरिकेतील कोलोराडो येथील एका नर्सने कोरोना लसीच्या रिकाम्या कुपींमधून एक छान झुंबर बनवले आहे. त्यातून तिने जगाला लसीकरणासाठी एक सुंदर संदेश दिला आहे. या नर्सचे नाव लॉरा वेसिस असे आहे. लसीकरणासह बोल्डर काउंटीच्या लोकांना मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि स्वयंसेवकांचा सन्मान करण्यासाठी तिने मॉडर्ना लसीच्या रिकाम्या कुपींमधून सुंदर झुंबर साकारले आहे.
लॉराने कसे साकारले झुंबर?
- लॉराच्या मते, या वर्षी असे बरेच लोक आहेत ज्यांनी कोरोना महामारी काळात बरेच काही गमावले आहे.
- त्यांच्या आयुष्यात खूप अंधार आहे.
- तिला या झुंबरातून त्यांचे आयुष्य प्रकाशाने भरायचे आहे.
- ते बनवण्यासाठी लॉरा ने एक ऑनलाइन फ्रेम खरेदी केली.
- त्यावर लसीच्या रिकाम्या कुपी लटकवून त्यावर लाइट लावली आणि सजावट केली.
- लॉरा निवृत्त झाली असली तरी, तिने या वर्षी बोल्डर काउंटी सार्वजनिक आरोग्याच्या लसीकरणाला मदत केली.
लॉरा म्हणातात की, “जेव्हा मी लसीकरणाचे काम करत होते, माझे लक्ष वारंवार त्या लसीच्या रिकाम्या कुपींकडे जायचे. ज्या निरुपयोगी म्हणून फेकल्या जात होत्या. एवढ्या सर्व कुपींना झुंबर म्हणून एकत्र पाहणे हा एक अद्भुत अनुभव असेल. यामुळे, मला वाटले की, मी या रिकाम्या कुपींचे झुंबर बनवू शकते.”